Today Horoscope : 'या' राशींच्या व्यापाऱ्यांना होणार आर्थिक लाभ, वाचा राशी भविष्य
कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 14 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.
संग्रहित छायाचित्र
मुंबई :जन्मकुंडलीतील 14 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
- मेष : आज तुमच्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळून कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचारविनिमय तुम्ही करु शकाल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागून तुमचा कार्यभार वाढणार असून कौटुंबिक गोष्टीत मनापासून रस घेऊन कुटुंबियाबशी सल्लामसलात आज तुम्ही कराल. गृहसजावटीचे आयोजन करुन आज तुमची आईशी जास्त जवळीक निर्माण होईल.
- वृषभ : व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ असून नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होऊन विदेशातील मित्रांकडून येणार्या बातम्या तुम्हाला भावविवश बनवणार आहेत.
-
मिथुन : आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागून बदनामीसह नकारात्मक विचारांपासून दूर राहणे तुम्हाला आज हिताचे ठरणार आहे. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासून कुटुंबीयांसह कार्यालयातील सहकाऱ्यांशी वादविवाद होईल, त्यामुळे मन सुन्न राहील. आजारी व्यक्तीची नव्याने तपासणी शक्यतो आज करू नका उलट मानसिक शांतीसाठी आज तुम्ही प्रयत्न करा.
-
कर्क : आजचा दिवस सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला लाभदायक ठरुन मौजमजेची साधने, उत्तम दागिने, वाहन खरेदी आज होणार आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास तुम्हाला सुखद अनुभव देऊन दाम्पत्य जीवनात उत्कट प्रेमाचा अनुभव आज तुम्हाला येणार आहे.
-
सिंह : आज उदासीन वृत्ती, संशयाचे काळे ढग तुमच्या मनाला वेढून टाकणार असून त्यामुळे आज तुम्हाला मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहून दैनंदिन कामात जरा अडचणी येणार आहेत.
-
कन्या : आजचा दिवस चिंता, उद्वेगाने भरलेला असून पोटाच्या त्रासामुळे तुमची आज प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊन अचानक धनखर्च होणार असून बौद्धिक चर्चेत असफल होण्याची शक्यता आहे. प्रियव्यक्तीचा सहवास लाभल्याने भिन्नलिंगी व्यक्तीकडे तुम्ही आज आकर्षित होणार आहात.
-
तूळ : तुम्ही आज खूप भावनाशील होणार असून त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहिल्याने आईशी मतभेद होतील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने कौटुंबिक, जमीनजुमल्या संबंधी चर्चा करताना दक्ष राहण्याची गरज आज तुम्हाला आहे.
-
वृश्चिक : आजचा दिवस कार्यात यश, आर्थिक लाभ मिळवून देणारा असून तुम्ही आज नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण प्रेमाचे संबंध राहून प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने मनाला आनंद वाटल्याने तुम्ही आज त्यांच्यासोबत जवळपासचा प्रवास कराल.
-
धनू : आज तुमची द्विधा मनःस्थिती, घरातील बिघडलेले वातावरण यामुळे तुम्हाला त्रास होऊन तुमचा नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागल्याने महत्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागून दूरस्थ मित्रांना तोंड द्यावे लागेल.
-
मकर : आज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगल्या वातावरणाने होऊन तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहणार आहे. तुमचे प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.
-
कुंभ : आज शक्यतो आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार करू नका, त्यामुळे फसगत होइल व खर्चाचे प्रमाणही वाढेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य आज तुम्हाला मिळणार नसल्याने स्वकीयांशी मतभेद होऊन इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
-
मीन : आज तुम्हाला सामाजिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळून मित्रांसह सुसंवाद साधल्याने तुमच्या मनाला आनंद होईल. सुंदरस्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवल्याने एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नीसह संततीकडून लाभ होऊन अचानक धनप्राप्ती होऊन नवीन महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
Last Updated : Apr 14, 2023, 6:15 AM IST