महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : या राशींच्या व्यक्तींना मिळेल जनमानसात मान-सन्मान, वाचा राशीभविष्य - दैनिक कुंडलीत राशी भविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 13 जूनच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
राशीभविष्य

By

Published : Jun 12, 2023, 5:34 PM IST

Updated : Jun 13, 2023, 7:04 AM IST

मुंबई :जन्मकुंडलीतील 13 जून 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

  • मेष : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल. मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी ह्यामुळे आपले कामात लक्ष लागणार नाही. प्रकृती नरमच राहील. एखाद्या मंगल प्रसंगी हजर राहण्याचे आमंत्रण मिळेल.
  • वृषभ :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. शारीरिक दृष्टया अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळण्यास उशीर होईल व त्यामुळे निराश व्हाल. आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील. प्रवासात विघ्ने येतील. एखाद्या कामाच्या मागे लागून सुख शांती गमावून बसण्याची शक्यता आहे.
  • मिथुन : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्यासह एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल. वाहन सौख्य मिळेल. आपल्या मान - सन्मानात व लोकप्रियतेत वाढ होईल.
  • कर्क :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस व्यापार - व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आज आपल्या सहवासात कुटुंबियांचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शत्रूवर विजय मिळेल. चालू कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल.
  • सिंह :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस नवनिर्माण व कला ह्या साठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात प्रअनुकूलता लाभेल. स्नेही व मित्र यांच्या गाठीभेटी होतील. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकेल.कन्या: आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर वाद किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. स्थावर संपत्तीच्या कामात सावध राहावे.
  • तूळ :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी राहील. एखाद्या प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आपसातील संबंध सुधारतील.
  • वृश्चिक :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल. आपल्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखावले जाईल. आपल्या वागणुकीचा कोणास त्रास होऊ नये म्हणून म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. स्वास्थ्य बिघडेल, मन उद्विग्न होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येईल.
  • धनू :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. एखादा प्रवास संभवतो. आपली माणसे भेटल्याचा आनंद होईल. स्नेहीजनां कडील मांगलिक प्रसंगात सहभागी व्हाल. यश - कीर्ती वाढीस लागेल.
  • मकर :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज मन अस्वस्थ राहील. एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. स्वकीय व मित्रांशी मतभेद होतील. धनहानी व मानहानीची शक्यता आहे. आज एखाद्या गूढ विद्येकडे आपला कल होईल. कोर्ट- कचेरीच्या कामात अपयश येईल. वाणीवर ताबा ठेवावा लागेल.
  • कुंभ :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज आपणांस मिळणार्‍या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. व्यापारी वर्गाला व्यापारात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल. संतती बरोबर चांगले संबंध राहतील. प्राप्तीत वाढ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल.
  • मीन: आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता वाढेल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. वयस्कर व वडील यांचेकडून लाभ होईल. कौटुंबिक आनंदामुळे आपण आनंदी राहाल.

हेही वाचा :

  1. Today Horoscope : या राशीच्या लोकांना बौद्धिक चर्चेत भाग घेता येईल, आर्थिक लाभ होतील, वाचा आजचे राशीभविष्य
  2. Love Horoscope : या राशीच्या प्रियकरांना मिळेल प्रेयसीची साथ, वाचा लव्हराशी
  3. Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
Last Updated : Jun 13, 2023, 7:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details