मुंबई : जन्मकुंडलीतील 13 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
मेष :आज नकारात्मक विचार, व्यवहार, नियोजनापासून तुम्हाला दूर राहण्याची गरज आहे, अन्यथा आळस दुःखात वाढ होऊन प्रकृती नरम गरमच राहील. तुमच्या हातातील कार्ये आज सहजपणे पार पडून प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळण्याची आज गरज आहे. दुपारनंतर परिस्थिती सुधारुन आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल, त्यासह आज व्यावसायिक कामानिमित्त तुम्हाला प्रवास करण्याची गरज पडेल.
वृषभ : आज तुमच्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने तुम्हाला आज सावध राहावे लागणार आहे. नवीन कार्यात अडचणी येऊन आज तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने आज तुम्हाला काळजी वाटून उक्ती आणि कृती यात तुम्हाला संतुलन ठेवून काम करावे लागणार आहे. व्यवसायात अडचणी उद्भवून नशिबाची साथ आज तुम्हाला मिळणार नसल्याने वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल.
मिथुन : आजचा दिवस तुम्हाला सौख्यदायी असून तुम्ही दिवसभर तुमची दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी तुम्हाला आज मनोरंजनाचा आधार घ्यावा लागून या आनंदात मित्रांना सहभागी करून घ्याल. दुपारनंतर मात्र मनात चिंता निर्माण होऊन तुमचा हळवेपणा वाढल्याचे दिसून येईल.
कर्क : आज व्यावसायिक वातावरण तुम्हाला अनुकूल असून स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळाल्याने त्यांचा आनंद गगणात मावेनासा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्याने तुम्हाला शारीरिक, मानसिक स्वास्थ्य चांगले राहणार असून बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला आजचा दिवस तुम्हाला अनुकूल आहे.
सिंह : आजचा दिवस तुम्हाला प्रणयाराधनेसाठी अनुकूल असून रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पोटाच्या व्याधी आज तुम्हाला त्रास देणार असून दुपारनंतर घरात आनंदाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता, उत्साह जाणवून व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे सहकारी आज तुम्हाला अपेक्षित सहकार्य करतील त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल.