महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना सुंदर प्रणयाराधनेचा योग; वाचा, रविवारचे राशी भविष्य - भविष्य

रविवारी कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. उद्याची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 12 मार्चच्या दैनिक कुंडलीत रविवारचे राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Tomorrow Horoscope
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 11, 2023, 5:29 PM IST

Updated : Mar 12, 2023, 6:19 AM IST

मुंबई : जन्मकुंडलीतील 12 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा रविवारचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, रविवारचे राशी भविष्य.

मेष : चंद्र सद्या तूळ राशीत स्थिर आहे. तुमच्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी असणार आहे. आज तुम्हाला सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळणार आहे. कौटुंबिक व दाम्पत्य जीवनात सुख समाधान मिळणार आहे. प्रणयाची पराकाष्ठा होणार आहे. मौजमस्ती व मनोरंजनामुळे सहजीवनात लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी सुसंवाद राहणार आहे.


वृषभ : चंद्र सध्या तूळ राशीत स्थिर असणार आहे. तुमच्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. आज तुम्ही उक्ती आणि कृती यावर संयम ठेवा. कोणाची मस्करी करण्याच्या नादात भांडण होण्याची शक्यता आहे. तुमच्या वर्तनाने गैरसमज निर्माण होतील. मौजमजा आणि करमणुकीवर खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. मानसिक उन्मत्तपणा अधिक अडचणी निर्माण करणार आहे, त्यामुळे त्यावर ताबा ठेवण्याची गरज आहे.




मिथून : सध्या चंद्र तूळ राशीत स्थिर असणार आहे. तुमच्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. तुम्हाला आज सगळीकडे लाभच लाभ मिळणार आहेत. कुटुंबात सुखशांती राहणार आहे. पत्नीसाठी खर्च करण्याची गरज निर्माण होईल. अविवाहितांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात उत्पन्न वाढण्याचीही शक्यता आहे. घरात शुभकार्ये घडण्यास अनुकूल काळ आहे. प्रियजनांचा सहवास आनंददायी ठरेल.



कर्क : सध्या चंद्र तूळ राशीत स्थिर राहणार आहे. तुमच्या राशीपासून चंद्र चवथ्या स्थानी असणार आहे. तुम्हाला आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखण्यासह इतर व्याधींचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. कुटुंबात कोणाशी खडाजंगी उडण्याची शक्यता आहे. मानहानी होऊ शकते. स्त्री आणि वाणी यांच्यामुळे एखादे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे. विशिष्ट कामासाठी पैसा खर्च होईल. वेळेवर भोजन मिळणार नसल्याची शक्यता आहे. निद्रानाशाचा त्रास होण्याचीही शक्यता आहे.



सिंह :सध्या चंद्र तूळ राशीत स्थिर आहे. तुमच्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी असणार आहे. आज तुम्ही चैतन्य आणि मनाची प्रसन्नता अनुभवणार आहात. तुमच्या मित्रांबरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्रांसह छोट्यामोठ्या सहलीचे आयोजनही करण्याची शक्यता आहे. आर्थिक फायदा होऊ शकते. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करणार आहे. नशिबाची साथ मिळणार आहे. आजचा दिवस नवीन काम किंवा योजना करण्यास अनुकूल आहे. आज तुम्हाला संगीतात विशेष रूची राहील.



कन्या :चंद्र तूळ राशीत स्थिर असणार आहे. तुमच्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी असणार आहे. कौटुंबिक सुख आणि शांतीमुळे आजचा तुमचा दिवस आनंदात जाणार आहे. आपल्या मधूर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करणार आहे. आज प्रवास होण्याची शक्यता आहे. आज आवडीचे भोजन मिळण्याची शक्यता आहे. आयात आणि निर्यात व्यापारात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र वादविवाद आणि चर्चांमध्ये आक्रमक होऊ नका.


तूळ : चंद्र आज तूळ राशीत स्थिर राहणार आहे. तुमच्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानावर असेल. आज तुमच्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होण्याची शक्यता आहे. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असल्यामुळे कामे यशस्वी होण्याची शक्यता आहे. वस्त्रालंकार आणि मनोरंजनासाठी पैसे खर्च होतील. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास रोमांचक व आनंददायी असणार आहे.


वृश्चिक : सध्या चंद्र तूळ राशीत स्थिर असणार आहे. तुमच्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानावर असणार आहे. आज तुमचा पैसा आणि वेळ हौसमौज व मनोरंजनासाठी खर्च होणार आहे. आरोग्याबाबत तक्रार राहणार आहे. मनात चिंता असणार आहे. एखादा अपगात होण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि सोयऱ्यांशी गैरसमज होतील. कोर्टकचेरीच्या कामात सावध राहावे लागणार आहे.


धनू : सध्या चंद्र तूळ राशीत स्थिर असणार आहे. तुमच्या राशीपासून चंद्र लाभात स्थानावर असमार आहे. आज तुम्हाला आर्थिक लाभासह सामाजिक प्रतिष्ठा मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख अनुभवण्याची शक्यता आहे. आज व्यापारात तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. प्रियजनांच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. मित्रांसह पर्यटन स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांचे विवाह ठरणार आहेत.


मकर : सध्या चंद्र तूळ राशीत स्थिर असणार आहे. तुमच्या राशीपासून चंद्र दशमात स्थानांवर असणार आहे. तुम्हाला आज व्यवसायात धनांसह मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. व्यापारासाठी धावपळ आणि वसुलीसाठी प्रवास होऊन तुमचा फायदा होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्यावर खूश असल्याने पदोन्नती होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे.


कुंभ : चंद्र तूळ राशीत स्थिर असणार आहे. तुमच्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानांवर असणार आहे. आज तुम्ही शारीरिक दृष्टया अस्वस्थ असले, तरीही मानसिक दृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत आज वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मौजमजा तसेच सहलीसाठी खर्च होऊ शकतो. संतती बाबतीत चिंता राहणार आहे. विरोधकांबरोबर चर्चेत सहभागी होऊ नका.



मीन :सध्या चंद्र तूळ राशीत स्थिर असणार आहे. तुमच्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानांवर असणार आहे. आज अवैध कामापासून दूर राहा. तसेच क्रोध आणि वाणीवर संयम ठेवण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहावे. आरोग्याच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. तुम्हाला आज मानसिक बेचैनी जाणवेल. कुटुंबियांशी असणार्‍या संबंधात नकारात्मकता येऊ देऊ नका. योग्य दिशा सापडण्यासाठी प्रयत्न करा.

Last Updated : Mar 12, 2023, 6:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details