मेष : आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेऊ शकाल. पण अती उत्साहाच्या भरात कामात बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. धन प्राप्ती संभवते.
वृषभ: आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक व मानसिक दृष्टया व्यस्त राहण्याचा आहे. एखाद्या काळजीमुळे मनावर ताण येऊन मन:स्वास्थ्य मिळू शकणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद झाल्याने घरातील वातावरणात वाद होईल. कष्टाच्या मानाने अपेक्षित प्राप्ती होणार नाही. त्यामुळे आर्थिक चिंता निर्माण होईल. पूर्ण विचार केल्या शिवाय कोणताही निर्णय आज घेऊ नये.
मिथुन : आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. स्त्री मित्रांकडून लाभ संभवतो. प्रवास आनंददायी होतील. स्वास्थ्य उत्तम राहील.
कर्क :आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. नोकरी - व्यवसाय करण्यार्यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील व त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांशी महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा करू शकाल. मन ताजे तवाने राहील. मातेशी चांगले संबंध राहतील. धन, मान, सन्मान मिळतील. घर सजावटीत आपण रस घ्याल. वाहनसौख्य मिळेल. सरकार कडून फायदा होईल. संसारिक सुखात वाढ होईल.
सिंह: आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. एखादा प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. पोट दुखीचा त्रास संभवतो. परदेशात राहणार्या आप्तांच्या बातम्या समजतील. वरिष्ठांशी मतभेद होतील. नोकरी - व्यवसायात अडथळे येतील. संततीची काळजी राहील. शरीरास थकवा, आळस व विमनस्कता जाणवेल.
कन्या : आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नवीन कामे सुरू केल्यास त्यात अडचणी येतील. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट होईल, म्हणून बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. महत्वाचे निर्णय किंवा जोखिम ह्यापासून वाचण्यासाठी विल, विरासत इत्यादीत अडचणी निर्माण होऊ शकतात. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्याने मन उदास होईल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ व रहस्यमय गोष्टीत रूची राहील.