महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Horscope : या राशींच्या व्यक्तींना लाभेल यश व कीर्ती, वाचा राशीभविष्य - कुंडली

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 3 जून च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horscope
राशीभविष्य

By

Published : Jun 2, 2023, 6:40 PM IST

Updated : Jun 3, 2023, 6:11 AM IST

मेष :आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज सांसारिक बाबीं पासून दूर राहण्याचे विचार मनात येतील. ह्या विचारांमुळे एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. असे असले तरीही बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अन्यथा काही वाद होऊ शकतात. हितशत्रूंचा त्रास होईल. शक्यतो नवीन कार्यारंभ आज करू नये. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ :आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याच बरोबर छोटया प्रवासाचे बेत आखाल. परदेशात राहण्यार्‍या संबंधिताकडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला आनंद होईल. अचानक धनलाभ संभवतो.

मिथुन : आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. पण केलेला खर्च वाया जाणार नाही. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभावात रागाचे प्रमाण मात्र वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कर्क : आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिक चिंता व उद्वेग राहील. अचानक खर्च वाढतील. वाद संभवतात. शक्यतो प्रवास व नवीन कार्याचा आरंभ टाळावा.

सिंह :आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनावर वैचारिक नकारात्मकतेचा पगडा राहील. संपत्तीच्या कागदपत्रावर सही करताना दक्षता घ्यावी. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कन्या :आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय व मित्रपरिवार ह्यांच्याशी असलेल्या संबंधात गोडवा वाढेल. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

तूळ :आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे. कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे. व्यवहारात हटवादीपणा सोडल्यास परिणाम सकारात्मक मिळतील. कुटुंबीयांशी वादविवाद टाळा. प्रकृतीकडे लक्ष द्या. आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक: आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा - समाधानाचे वातावरण राहील. मित्र व स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे.

धनू :आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवला नाही तर एखाद्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल. एखादा अपघात संभवतो. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. प्रकृती सुद्धा बिघडू शकेल. शांतता मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील.

मकर :आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. सगे - सोयरे व मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहेच्छुकांना अपेक्षित जोडीदार मिळेल. व्यापारात सुद्धा दिवस लाभदायी ठरेल. सहल - प्रवास होतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होईल.

कुंभ :आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त होतील. मित्र व कुटुंबीयांसह आनंददायी प्रवास कराल. आज दिवसभर कामे सहजपणे यशस्वी होत असल्याचा अनुभव येईल. त्या कामातून लाभ होतील.

मीन :आज चंद्र रास बदलून 03 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका व मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. प्रवास यशस्वी होतील. व्यापारी बंधूंना व्यापारात अडचणी येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  2. Today Love Horoscope : या राशींच्या व्यक्तींनी मुलांच्या आरोग्याची घ्यावी काळजी, वाचा लव्हराशी
  3. Love horscope : या राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ आणि प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल; वाचा लव्हराशी
Last Updated : Jun 3, 2023, 6:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details