पुणे -हे वर्ष या कुंभ राशीच्या जातकांसाठी साधारणपेक्षा ( How Will be new year for Aquarius ) उत्तम असणार आहे. या वर्षात करिअरमध्ये मिळणारे यश आणि आपले परिश्रम आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहे. वर्षांच्या सुरुवातीचे चार महिने राशी स्वामी शनी स्व राशीत गोचर करणार आहे. यामुळे निर्णय क्षमता चांगली असेल. या शिवाय या राशीच्या जातकांना समाजातील काही महत्वपूर्ण परिस्थितीला सामोरी जावे लागणार.
करिअर आणि पैसा मिळेल का? -
नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष आनंददायी ठरू शकते. यावर्षी तुमची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार आहेत, त्यांनाही यावर्षी रोजगार मिळू शकतो. गेल्या वर्षी तुमच्या करिअर क्षेत्रात आलेल्या अडचणीही दूर होऊ लागतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही सहकाऱ्यांशीही मैत्रीपूर्ण वागाल, त्यामुळे सहकारीही तुम्हाला सहकार्य करतील. तुमची कोणतीही कल्पना कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम करू शकते. या राशीच्या व्यावसायिकांबद्दल सांगायचे तर, या वर्षी तुम्ही जास्त धोका पत्करणे टाळावे. तसेच, व्यावसायिकांना या वर्षाच्या मध्यात सुज्ञ गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकतो. जे लोक वडिलोपार्जित व्यवसाय करतात त्यांच्यासाठी २०२२ हे वर्ष शुभ राहील. या वर्षी विद्यार्थ्यांना लाभदायक वर्ष आहे. यावर्षी परदेशी जाण्याचे योग संभवतात. तसेच नवनवीन संधी शिक्षणात मिळू शकतात, त्या स्वीकारून पुढे जावे लागेल.
आर्थिक जीवन कसे असेल? -
गेल्या वर्षभरात आर्थिक बाजूची चिंता या वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर संपुष्टात येईल. या वर्षी तुम्ही पैसे वाचवण्याचे प्रयत्न कराल आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळू शकेल. अनावश्यक खर्च कसा टाळावा, यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराचा किंवा पालकांचा सल्ला घेऊ शकता. या राशीचे काही लोक या वर्षी जमीन किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार देखील करू शकतात. परंतु लक्षात ठेवा की गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. एप्रिल ते वर्षअखेरीपर्यंतचा काळ आर्थिक बाजूने सुखद राहील.