- मेष -
हे वर्ष आपणास मध्यम फलदायी ठरणारे आहे. आपल्यात ऊर्जेची कमतरता नसली तरी सुद्धा त्या ऊर्जेस योग्य प्रमाणात क्रियान्वित करण्याची आवश्यकता आपणास भासेल. आपण कोणत्या गोष्टीस प्राधान्य द्यावे ह्याचा निर्णय करणे आपल्यासाठी अवघड होऊन बसेल अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होईल. अशा परिस्थितीत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अनुभव किंवा सल्ला आपल्या उपयोगी पडू शकेल. आपणास जर परदेशात प्रवास करावयाचा असेल तर त्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. वर्षातील मार्च, मे व जुलै हे महिने त्यासाठी अनुकूल आहेत. ह्या तीन महिन्यात केलेल्या प्रवासामुळे आपली आर्थिक बाजू भक्कम होईल व त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या प्रबळ व्हाल. कुटुंबियांशी आपला संपर्क वाढेल. त्यांच्याकडे मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करून त्यांची मदत घेऊ शकाल. पैश्याच्या मागे धावण्याची वृत्ती सोडणे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. कुटुंबियांसाठी अधिक वेळ काढून त्यांच्या जवाबदाऱ्या समजून घ्याव्या लागतील. मानसिक शांतता लाभण्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन वेळ घालविण्यास आपण प्राधान्य द्याल. असे केल्याने आपणास आराम वाटेल, त्यासाठी कदाचित आपण थोडा वेळ एकांतात बसण्यास प्राधान्य द्याल. प्राणायाम करण्याची संवय लावून घ्या. असे केल्याने आपल्या मानसिक क्षमतेचा सुद्धा विकास होईल व त्यामुळे आपणास कोणताच त्रास होणार नाही. हे वर्ष आपणास बरेच काही देणारे आहे. त्यासाठी मात्र आपणास स्वतःला तैयार ठेवावे लागेल, तसेच श्रम करण्यासाठी सुद्धा तत्पर राहावे लागेल. आपले कार्यकौशल्य आपल्या बाजूने कौल देईल.
- वृषभ -
वृषभ राशीच्या व्यक्तींना २०२२ चे वर्ष चांगल्या बातम्या देणारे आहे. ह्या वर्षी आपले नशीब फळफळेल. त्यामुळे गेल्या वर्षांपासून आपल्या जीवनास जी गती येऊ लागली आहे ती अधिक वेग घेऊन आपणास प्रगतीपथावर नेवून ठेवेल. आपण जर व्यापार करत असाल तर हळूहळू आपली व्यापारात प्रगती होऊन प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. ह्या वर्षात आपली इच्छापूर्ती होईल, ज्यात प्रामुख्याने अनेक दिवसांपासून प्रतिक्षीत असलेल्या एखाद्या प्रवासाचा समावेश असू शकतो. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांनी जर प्रयत्न केले तर त्यांना वर्षाच्या मध्यास चांगली बातमी मिळू शकेल. आपले कौटुंबिक जीवन सामान्यच राहील. वर्षाच्या मध्यास कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची प्रकृती ढासळल्याने आपल्या चिंतेत भर पडेल, परंतु त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होईल. घरात पुन्हा आनंदाचे वातावरण पसरेल. ह्या वर्षात आपल्या वडिलांना सुद्धा यश प्राप्त होण्याची संभावना आहे. आपल्या जीवनात स्थैर्य येऊ लागेल. आपण आपल्या जवाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल, तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा बहरून उठेल. ह्या वर्षात आपल्या प्रकृतीत अनेक चढ - उतार येण्याची संभावना असल्याने आपणास आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या वर्षी आपण नवीन काही शिकून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कराल. आपल्या वागणुकीत थोडा बदल होईल असे ग्रहांचे वृषभ राशीवर होणारे परिणाम निर्देशित करत आहेत. आपण आपल्याहून कोणालाही अधिक महत्व देणार नाहीत व हीच आपली नकारात्मक बाजू असेल. असे झाल्यामुळे काही चांगल्या व्यक्तीं आपल्या पासून दुरावल्या जातील. आत्मविश्वासाचा अतिरेक न करता इतरांना सुद्धा समान दर्जा देणे आपल्या हिताचे राहील. त्यामुळे आपले संबंध दृढ होतील तसेच व्यावसायिक जीवनात सुद्धा चांगले यश प्राप्त होईल. ह्या वर्षात आपल्या नवीन ओळखी होऊन त्यांच्याशी मैत्री होईल. संवाद साधल्याने आपणास चांगला लाभ होईल. आपल्या कार्यालयात सुद्धा आपला चांगला मान - सन्मान होऊन आपल्या सुख सोयीत वाढ होईल. ह्या वर्षातील प्रवास आपले मनोबल उंचावणारे होतील व त्यामुळे आपण नवीन लोकांच्या संपर्कात याल.
- मिथुन -
मिथुन व्यक्तींसाठी २०२२ चे वर्ष खूपच चांगले आहे. ह्या वर्षात आपण काही नवीन सिद्धी प्राप्त कराल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. आपले कठोर परिश्रम व एकाग्रतेने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे आपणास मिळालेले यश हे निर्विवाद तर असेलच, शिवाय त्याची इतरत्र सुद्धा चर्चा होईल. त्यामुळे आपण इतरांची मने सुद्धा जिंकू शकाल. व्यापाऱ्यांना प्रसिद्धी व आर्थिक लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या वरिष्ठांचा विश्वास संपादन करून बढती सुद्धा मिळवू शकतील. या वर्षात प्रकृतीचा त्रास होण्याची संभावना असल्याने आपणास त्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. खर्च नियंत्रित ठेवणे आपल्यासाठी आव्हानात्मकच असेल. कुटुंबातील एकोपा बघून आपले आंतरिक समाधान होईल. वर्षाचा मधला काळ आपल्या अपेक्षेहून अधिक चांगला असून आपणास आराम वाटेल. आपणास कार्यात यश मिळाले तरी काही कार्यात अडथळे येण्याची संभावना आहे. येणारे अडथळे कालांतराने दूर होणार असल्याने आपण काळजी करू नये. आपणास आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवावा लागेल. त्यांच्या सहकार्याने आपण जे काम कराल त्यात प्रगती साधाल. ह्या वर्षात आपणास प्रवासाच्या अनेक संधी प्राप्त होतील. धार्मिक प्रवासाची संभावना अधिक आहे. वर्षाच्या सुरवातीस आपले शत्रू आपल्या विरुद्ध कट - कारस्थान रचण्याची संभावना असल्याने आपणास त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल. वर्षाच्या मध्यास आपण त्यांच्यावर मात करू शकाल व वर्ष अखेरीस परिस्थितीत बदल होऊन काही शत्रू आपले मित्र देखील होतील. असे झाल्याने आपण आनंदित व्हाल. त्यांच्यापासून आपणास कोणताही त्रास होणार नाही. ह्या वर्षात आपल्या आत्मविश्वासाने आपण भरपूर यश संपादन करू शकाल. ह्या वर्षात आपणास विशेषतः आपल्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ह्या शिवाय आपणास इतर कोणताही मानसिक त्रास होणार नाही.
- कर्क -
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी २०२२ चे वर्ष अनेक बाबतीत चांगले आहे. व्यापारात आपली उत्तम प्रगती होईल. आपणास जेथून अपेक्षा नसेल अशा ठिकाणाहून सुद्धा चांगला फायदा होण्याची संभावना आहे. आपण जर नोकरी करत असाल तर हळूहळू आपली प्रगती होऊन आपणास चांगली पगारवाढ सुद्धा मिळू शकेल. आपल्या कामाची प्रशंसा होईल. सहकारी वर्गात आपले वजन वाढेल. कौटुंबिक वातावरण आपल्या प्रगतीत मदतरूप होईल. वर्षाच्या मध्यास कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने आपल्या काळजीत वाढ होईल, परंतु वर्षाचे शेवटचे तीन महिने अनुकूल राहतील. कुटुंबात एकोपा राहील. कुटुंबीय एकमेकांची काळजी घेऊ लागतील. ह्या वर्षी आपणास नवीन कामे हाती घेण्याची संधी मिळू शकते. काही नवीन योजना सुरु होऊन आपल्या विचारसरणीत मोठे परिवर्तन घडवून आणतील. आपली कल्पकता बदलल्याने आपण जीवनाकडे व्यापक दृष्टिकोन ठेवून बघू लागाल. आत्मचिंतन करून जीवनात आपण काय चांगले व काय वाईट केले यावर विचार करू लागाल. त्याचा असा परिणाम होईल कि नवीन ऊर्जेसह कोणत्या क्षेत्रात व कशा प्रकारे काम करावयास हवे ह्याचा आपण विचार कराल. प्रगती साधण्यास आपल्याला त्याची मदतच होईल. ह्या वर्षात आपणास काही गूढ विद्यांची गोडी लागून त्यातील काही विषयांचे ज्ञान आपण प्राप्त सुद्धा करू शकाल. आध्यात्मिक गोष्टीत आपली रुची वाढून त्याचा आपण आनंद घ्याल. आपली प्रतिष्ठा उंचावेल. आपणास एखाद्या आध्यात्मिक गुरूंचे किंवा व्यक्तीचे मार्गदर्शन मिळाल्याने आपल्या जीवनास कलाटणी मिळेल. ह्या वर्षात व्यापारासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. आपण जर त्यासाठी प्रयत्न केलेत तर त्यात आपणास यश प्राप्त होऊ शकेल.
- सिंह -
अनेक बाबतीत २०२२ चे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना चांगले जाणारे आहे. ह्या वर्षात आपण कारकिर्दीत उच्च शिखर गाठू शकाल व त्यामुळे आपल्यावर महत्वाची जवाबदारी सोपविण्यात येईल. असे झाल्याने आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल. हे वर्ष व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगले आहे. ते आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. हे वर्ष आर्थिक उत्कर्षाचे असले तरी आपणास योग्य आर्थिक नियोजन करावे लागेल. तसे न केल्यास मिळविलेला सर्व पैसा खर्च होऊन हाती काहीच शिल्लक राहणार नाही. ह्या वर्षी आपण जर प्रयत्न केलेत तर आपणास एखादी मोठी जमीन किंवा स्थावर मिळू शकेल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. आपला वैवाहिक जोडीदार धार्मिक विचारांसह नातेसंबंध टिकवून ठेवेल. आपल्या नात्यात समजूतदारपणा वाढल्याने हे वर्ष वैवाहिक जीवन सुखद करेल. वर्षाच्या मध्यास वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने काही समस्या निर्माण होतील, मात्र आपण योग्य ती काळजी घेतल्यास सर्व काही सुरळीत होईल. आपण जर परदेशात जाण्यासाठी इच्छूक असाल तर तशी संधी आपणास फेब्रुवारी, मे व जून ह्या दरम्यान मिळण्याची संभावना आहे. फेब्रुवारीत आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. त्या नंतर जुलै व ऑगस्ट दरम्यान आपली प्रकृती बिघडू शकते. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपणास कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागेल. एखाद्या कारणाने कुटुंबात वाद होण्याची संभावना आहे. त्यामुळे आपण मानसिक दृष्ट्या काहीसे बेचैन राहाल, मात्र समजूतदारपणा दाखविल्यास अशा परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकाल. आपणास सासुरवाडी कडून काही लाभ होईल. इतकेच नव्हे तर सासुरवाडी कडील लोकांच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या कामात प्रगती साधू शकाल. आपण जर व्यापार करत असाल तर त्यात सासुरवाडीचे योगदान अधिक असेल. ह्या प्रमाणे हे वर्ष आपल्या समोर अनेक आव्हाने व काही नवीन संधी घेऊन येणारे आहे. आपणास हिमतीने आव्हानांचा सामना करावा लागेल, तसेच हाती आलेल्या संधींचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल. असे केल्यास हे वर्ष आपल्यासाठी यशस्वी वर्ष ठरू शकेल.
- कन्या -
कन्या व्यक्ती चतुर असून आपली कामे इतरांकडून करवून घेण्यात ते तरबेज असतात. ग्रहांच्या स्थितीनुसार ह्या वर्षाचा बहुतांश काळ आपणास नशिबाची साथ देणारा असून आपण ह्या वर्षी आपली कामे सुरळीतपणे पार पाडू शकाल. आपण दूरवरचे प्रवास सुद्धा कराल व त्यामुळे आपला उत्साह वाढून आपल्या जीवनात नावीन्य निर्माण होईल. असे झाल्याने आपणास ताजेतवाने वाटू लागेल. ह्या वर्षात आपली प्रकृती साधारणच राहिली तरी कोणतीही मोठी समस्या निर्माण होईल असे दिसत नाही. कौटुंबिक जीवनात प्रेम व आपुलकी असल्याचे दिसून आले तरी त्यात काही समस्या निर्माण होण्याची संभावना असून आपणास त्यावर लक्ष द्यावे लागेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या विवाहा संबंधी चर्चेत आपणास सहभागी व्हावे लागेल. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांना मार्च - एप्रिल व त्या नंतर ऑगस्ट - सप्टेंबर दरम्यान परदेशी जाण्याची संधी मिळू शकेल, अशा संधीचा फायदा घ्यावा. ह्या वर्षात भावंडांशी काही कारणाने वितुष्ट येण्याची संभावना असल्याने आपण शक्य तितके शांत राहून भांडण टाळण्याचा प्रयत्न करावा. आपणास काही मित्रांचे सहकार्य मिळेल तर काही मित्र आपणास त्रास देतील. त्यामुळे आपल्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची संभावना असल्याने शक्यतो असे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करावा. मार्च महिन्यात नोकरीच्या ठिकाणी एखादी चूक होऊन आपणास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, तेव्हा दक्ष राहावे. जून व जुलै दरम्यान आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण मोठ - मोठ्या आव्हानांना सामोरे जाऊन समस्यांचे निराकरण सुलभतेने करू शकाल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल. आपली प्रशंसा सुद्धा केली जाईल. ह्या वर्षात विरोधकांपासून सावध राहावे लागेल. ते अनेकदा आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आपला कल महत्वाच्या पौराणिक वस्तुं बद्धल समजून घेण्याकडे झाल्याने आपणास नवीन काहीतरी शिकावयास मिळेल. ह्या वर्षात आपणास संतती विषयक काही चिंता सतावतील. आपण संततीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करू लागाल. एकंदरीत हे वर्ष आपल्यासाठी मध्यम फलदायी ठरणारे आहे.
- तूळ -