बस्ती ऑनर किलिंगच्या खळबळजनक घटनेने उत्तर प्रदेशातील Murder of a loving couple in Uttar Pradesh संपूर्ण बस्ती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रुधौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पदरियाचेत सिंग गावाच्या पश्चिमेला पारस नाथ चौधरी यांच्या उसाच्या शेतात एका १८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह Youth found dead in Basti UP आढळून आला. अंकित असे मृतकाचे नाव आहे. त्याच्या शरीरावर ओरखडे व जखमा आढळल्या. चौकशीसाठी पोलीस मृताच्या घरी पोहोचले. वडील रामफेर आणि आई कुमारी देवी यांनी गावातीलच इर्शादवर हत्येचा संशय दर्शवला. अंकित गावात इर्शादच्या घरी ट्रॅक्टर चालवायचा. Honor killing in UP
अमिना खातूनच्या मृत्यूचे रहस्य कायम-अंकित इर्शादच्या घरी नियमित येत असे. शुक्रवारी रात्री आईच्या हाकेवरून इर्शाद घरी गेला. तेव्हापासून बेपत्ता होता. त्यानंतर अंकितला फोन करूनही तो फोन उचलत नव्हता. पण बेल वाजत होती. अंकितच्या आई-वडिलांच्या माहितीच्या आधारे इर्शाद पोलिस घेऊन घरी पोहोचला तेव्हा कळले की, इर्शादची बहीण अमिना खातून हिचा काल रात्री मृत्यू झाला. सकाळी तिचे शव गावाबाहेरील स्मशानभूमीत दफन करण्यात आले. Honor killing in Basti UP