बागलकोट (कर्नाटक): Honor killing in Karnataka: जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील तकोडा गावात शनिवारी रात्री एका व्यक्तीने आपल्या जावयाची हत्या केली. क्षत्रिय समाजातील मुलीने आई-वडिलांच्या संमतीशिवाय जैन समाजातील मुलाशी लग्न केले होते. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. Father killed his daughters husband
Honor killing in Karnataka: कर्नाटकात हॉनर किलिंग.. लव्ह मॅरेज केलं म्हणून सासऱ्याने जावयाचीच केली हत्या - कर्नाटकात हॉनर किलिंग
Honor killing in Karnataka: कर्नाटकात हॉनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत लव्ह मॅरेज केल्याने सासऱ्याने जावयाची हत्या केल्याची घटना घडली आहे. Father killed his daughters husband
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबाला करजगी (वय 34) या जैन समाजातील तरुणाचे क्षत्रिय समाजातील तम्मनगौडा पाटील यांची मुलगी भाग्यश्री हिच्यावर प्रेम होते. दोघांनीही काही महिन्यांपूर्वी आई-वडिलांच्या संमतीशिवाय लग्न केले. याचा मुलीच्या वडिलांना खूप राग आला. जमखंडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले की, भुजबाला शनिवारी रात्री भगवान हनुमानाच्या (पल्लक्की) पालखी उत्सवानंतर भावाच्या मुलासह दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर मिरची पूड फेकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.
खून केल्यानंतर आरोपीने जमखंडी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. तममनगौडा पाटील याला पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वी युवतीच्या पालकांना आणि तरुणाला पोलिसांनी बोलावून समजूत काढली होती.