महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बलात्कार आरोपी राम रहीम कोरोना बाधित, हनीप्रीत रात्रंदिवस करतेय सेवा - ram rahim honeypreet

गुरमीत राम रहीम कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मेदांता रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राम रहीमच्या तब्येतीची काळजी घेण्याची जबाबदारी हनीप्रीत ने घेतली आहे.

राम रहीमला झाला कोरोना; हनीप्रीत करत आहे नर्स बनून सेवा
राम रहीमला झाला कोरोना; हनीप्रीत करत आहे नर्स बनून सेवा

By

Published : Jun 7, 2021, 2:30 PM IST

Updated : Jun 7, 2021, 2:51 PM IST

गुरुग्राम -रविवारी गुरमीत राम रहीम कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन झाले होते. त्यानंतर त्याला गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची मानलेली मुलगी हनीप्रीतला भेटण्याचा आग्रह तो करत होता. त्यानंतर हनीप्रीत त्याच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार, हनीप्रीतने १५ जूनपर्यंतचे रुग्णालयातील राम रहीम यांच्या अटेंडेंटचे कार्ड बनवून घेत आहे. आज सकाळी ८.३० वाजल्यापासून हनीप्रीत राम रहीमच्या खोलीतच आहे. राम रहीम पूर्णपणे बरे होईपर्यंत हनीप्रीत त्याची काळजी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

हनीप्रीत व राम रहीम यांचे नाते

हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यात राहणारी प्रियंका तनेजा १९९६ साली प्रथमच डेरा येथील काॅलेजमध्ये ११ वीच्या वर्गात शिकायला आली होती. त्यानंतर राम रहीमने प्रियंकाला नवीन नाव दिले होते. आता प्रियंका ही राम रहीमची हनीप्रीत म्हणून ओळखली जाते. हळूहळू हनीप्रीत व राम रहीम यांच्यातील जवळीकता वाढायला लागली. याच दरम्यान तिच्यासमोर बाबाचे काही रहस्यही उघड होत होते. त्यानंतर हनीप्रीत राम रहीमची सगळ्यात जवळची व विश्वासू व्यक्ती बनली. हनीप्रीत ही माझी मानलेली मुलगी आहे, असे तो सांगतो. राम रहीमने तिला कधी डेराच्या बाहेरही नाही जाऊ दिले. तिचे सर्व शिक्षणही डेऱ्यातच पूर्ण केले. तसेच तिच्या नावावर अनेक उद्योगही सुरु केले आहेत. अनेक वर्षांपासून हनीप्रीतचे कुटुंब डेराशी जोडले गेलेले होते.

हेही वाचा -लोकांसाठी दारू ही टॉनिकपेक्षा कमी नाही - केंद्रीय मंत्री कुलस्ते

Last Updated : Jun 7, 2021, 2:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details