बदलत्या ऋतूत सर्दी-पडसेचा त्रास होतो. त्यामुळे हवामान बदलत (during changing seasons) असताना विशेष काळजी घ्यावी. सर्दी झाल्यास तुम्ही काही घरगुती उपायांचा (home remedies to prevent colds and infections) अवलंब करू शकता. यासाठी तुम्हाला फार काही करण्याचीही गरज नाही. आपल्या घरच्या स्वयंपाक घरात अशा अनेक गोष्टी आणि मसाले आहेत, ज्याचा वापर करून तुम्हाला सर्दी-खोकल्यापासुन आराम मिळतो. तर जाणून घ्या सर्दी झाल्यास तुम्ही कोणते सोपे उपाय करू शकता. Good Health
कोमट पाणी प्या किंवा वाफाळलेले गरम पाणी घ्या : थंडीमुळे घसा बंद वाटत असेल तर कोमट पाणी प्यावे. त्यात थोडे मीठ टाकून तुम्ही कोमट पाण्याने गार्गल करू शकता. यामुळे साचलेला कफ साफ होतो, आणि घसा उघडतो. यामुळे छातीत जमा झालेला कफही निघून जातो. ही रेसिपी जवळपास प्रत्येक घरात माहीत आहे. सर्दी झाल्यास गरम पाण्याची वाफही घेऊ शकता. यामुळे तुम्हाला खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळेल.
हळदीचे दूध : हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. सर्दी-खोकला झाल्यास रात्री झोपताना कोमट दुधात हळद मिसळून प्या. यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सर्दी आणि सर्दीमध्ये खूप फायदेशीर आहेत.