महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

HANUMAN JAYANTI ADVISORY : हनुमान जयंतीसाठी गृहमंत्रालय सतर्क, कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे राज्यांना निर्देश - तोडफोडीच्या घटना घडल्या

रामनवमीला देशात काही ठिकाणी हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमिवर केंद्रिय गृहखात्याने राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे आदेश दिले आहे. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमिवर हे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखून उत्सव साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

HANUMAN JAYANTI ADVISORY
HANUMAN JAYANTI ADVISORY

By

Published : Apr 5, 2023, 3:44 PM IST

Updated : Apr 5, 2023, 6:53 PM IST

नवी दिल्ली -रामनवमीच्यावेळी पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्राने बुधवारी सर्व राज्यांना 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यास आणि शांतता बिघडू शकते अशा कोणत्याही घटकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या जातीय हिंसाचारानंतर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या सर्वच यंत्रणा सतर्क करण्याच्या उद्देशाने गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना जारी -हनुमान जयंतीच्या तयारीसाठी गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व राज्यांना या सल्लावचा सूचना जारी केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, सण शांततेत साजरा करण्यासाठी आणि समाजात जातीय सलोखा बिघडवणाऱ्या कोणत्याही घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारांना सतर्क केले आहे. गृहमंत्र्यांच्या कार्यालयाने याबाबत ट्विटही केले आहे.

तोडफोडीच्या घटना घडल्या -पश्चिम बंगालच्या हुगळी आणि हावडा जिल्ह्यात रामनवमीच्या मिरवणुकांवर गेल्या काही दिवसांत चकमकी आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. पश्चिम बंगालच्या रिश्रामध्ये रविवारी रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी झाली. ज्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाचे पुरसुराचे आमदार विमान घोष उपस्थित होते. नजीकच्या सेरामपूरच्या काही भागांमध्येही तोडफोडीच्या घटना घडल्या. नंतर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आणि इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली.

हिंसाचारग्रस्त भागांना भेट -या हिंसाचारामुळे पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलल्यानंतर काही हिंसाचारग्रस्त भागांना भेट दिली. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून जातीय हिंसाचाराचा सविस्तर अहवाल मागवला. बिहारच्या सासाराम आणि बिहारशरीफ शहरांमध्येही रामनवमीनंतर जातीय हिंसाचार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी 170 हून अधिक लोकांना अटक केली होती. 30 आणि 31 मार्च रोजी दोन्ही शहरांमध्ये जातीय भडकलेल्या घटनांमध्ये वाहने, घरे आणि दुकाने जाळली गेली आणि अनेक लोक जखमी झाले.


घटनेबद्दल चिंता -गृहमंत्री शाह यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याशी चर्चा केली. गृह मंत्रालयाने परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य प्रशासनाला मदत करण्यासाठी अतिरिक्त निमलष्करी दल बिहारमध्ये पाठवले. शहरात मनाई आदेश लागू झाल्यानंतर शहा यांनी 2 एप्रिल रोजी सासारामचा प्रस्तावित दौरा रद्द केला होता.

हेही वाचा -नंदुरबारमध्ये किरकोळ वादातून दोन गटात दगडफेक, पोलीस कर्मचारी जखमी, 15 हून अधिक जणांना अटक

Last Updated : Apr 5, 2023, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details