महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पेगासस प्रकरणावर अमित शाह म्हणाले, क्रोनोलॉजी समजून घ्या... - home minister amit shah reacts on pegasus

पेगासस स्पायवेअरप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अप्रत्यक्षप्रणे विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.

अमित शाह
अमित शाह

By

Published : Jul 20, 2021, 4:18 AM IST

नवी दिल्ली - पेगासस स्पायवेअरवरून देशात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून पेगासस स्पायवेअर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, जागतिकस्तरावर भारताला अपमानित करण्याचा काही वर्गांकडून प्रोत्साह दिले जात आहे. त्याबाबत आम्ही सायंकाळी रिपोर्ट पाहिला आहे. विध्वंस करणाऱ्या कटाच्या माध्यमातून भारताचा विकास हा रुळावरून घसरणार नाही. पावसाळी अधिवेशन विकासाचा नवा मापदंड करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा-Pegasus Snooping : अमित शाहांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी; वाचा, काय आहे प्रकरण?

रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला -

पेगसस हेरगिरी प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या प्रकरणी आता भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पेगॅससचा अहवाल ठिक पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वीच कसा आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी एमनेस्टीवरही शंका उपस्थित केली आहे. एमनेस्टीचा भारत विरोधी अजेंडा जगजाहिर असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी काँग्रेसने केलेले आरोप निराधार असल्याचेही म्हटले. दरम्यान, लोकसभेत आईटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात भूमिका जाहीर केली असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सुरू

एमनेस्टीचा भारत विरोधी अजेंडा जगजाहीर' -

यावेळी रविशंकर प्रसाद यांनी एमनेस्टीवर गंभीर आरोपही केले. एमनेस्टीचा भारत विरोधी अजेंडा जगजाहिर असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच एमनेस्टीला भारत सरकारने त्यांच्या विदेशी फंडींगबाबत विचारले असता, त्यांनी भारतातून आपला गाशा गुंडाळला, असेही ते म्हणाले.

हेही वाचा-11th CET exam २१ ऑगस्टला होणार; उद्यापासून नोंदणी सुरू

काय आहे पेगासस सॉफ्टवेअर -

पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे स्पायवेअर बनवलं आहे. ज्याद्वारे आयफोन आणि अँड्रॉइड डिव्हाइस हॅक केले जाऊ शकतात. यासह, मालवेअर पाठविणारे त्या फोनचे संदेश, फोटो आणि अगदी ई-मेल पाहू शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details