नवी दिल्ली - 'जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 आम्ही रद्द केले. याला 17 महिने झाले आहेत. आम्हाला विचारण्यात येत आहे की, हे या राज्याचा विशेष दर्जा रद्द करताना दिलेली आश्वासने आमच्या लक्षात आहेत का? आम्ही त्या आश्वासनांचे काय केले? आपण 17 महिन्यांच्या हिशेबाची मागणी करत आहात. आपण 70 वर्षांत काय केले, याचा हिशेब दाखवला काय? तुम्ही तुमचे काम योग्यरित्या केले काय? तर मग, आम्हालाही विचारण्याची गरज नाही,' असा सवाल गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत केला.
'अनेक खासदारांचा आरोप आहे की, जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2021 आणणे म्हणजे जम्मू-काश्मीरला राज्य मिळणार नाही, यावर शिक्कामोर्तब आहे. मी विधेयकाविषयी मार्गदर्शन करत आहे. मी ते आणले आहे. मी हेतू स्पष्ट केले आहेत. जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार नाही, असे कुठेही लिहिलेले नाही. आपण कुठून निष्कर्ष काढत आहात,' असा सवालही शाह यांनी केला.
'या विधेयकाचा प्रदेशाला राज्याचा दर्जा नाकारण्याशी संबंध नाही'
- 'या सभागृहात मी आधीही म्हणालो आहे आणि मी पुन्हा म्हणतो की, या विधेयकाचा जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याशी किंवा न देण्याशी काहीही संबंध नाही. जम्मू आणि काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा देण्यात येईल,' असेही शाह म्हणाले.
- 'येथे असा प्रश्न विचारला जात आहे की, आर्टिकल 370 हटवताना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? मी याचे उत्तर देईन. परंतु, मला विचारायचे आहे की, आर्टिकल 370 हटवून केवळ 17 महिने झाले आहेत. तुम्ही 70 वर्षे काय केले याचा हिशेब घेऊन आला आहात का,' असा सवाल शाह यांनी केला.
- शाह म्हणाले की, 'ज्यांना पिढ्यानपिढ्या देशावर राज्य करण्याची संधी मिळाली, त्यांनी स्वत:च्या कार्यकाळामध्ये डोकावून पाहावे. तुम्ही आम्हाला एका महिन्याचा तरी हिशेब मागण्यास पात्र आहात का?'
- गृहमंत्री म्हणाले की, 'मला या सभागृहात पुन्हा एकदा सांगायचे आहे की, कृपया जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती समजून घ्या. राजकारण करण्यासाठी असे कोणतेही विधान करू नका, ज्याने जनतेची दिशाभूल होईल.'