महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Home Drug Factory : नायजेरियन व्यक्ती घरात चालवत होता ड्रगचा कारखाना, १० कोटींचं घबाड जप्त - नायजेरियन व्यक्तीला अटक

Home Drug Factory : बेंगळुरू येथे एक नायजेरियन व्यक्ती त्याच्या घरात छोटा ड्रगचा कारखाना चालवत होता. अंमली पदार्थ विरोधी पथकानं छापा टाकून याचा पर्दाफाश केला. वाचा पूर्ण बातमी...

Home Drug Factory
Home Drug Factory

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 7:26 PM IST

बेंगळुरू Home Drug Factory : कर्नाटकातील बेंगळुरू येथे पोलिसांनी एका घरातील मिनी ड्रग कारखान्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी एका नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सीसीबीच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली.

१० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारखान्यात सिंथेटिक औषधं तयार करून देश-विदेशात विकली जायची. बेंजामिन असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो मूळचा नायजेरियाचा रहिवासी आहे. या छाप्यात तब्बल १० कोटी रुपयांच्या एमडीएमए (सिंथेटिक ड्रग) सह, त्याच्या उत्पादनात वापरलं जाणारं रसायन, रासायनिक अ‍ॅसिड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं.

घरात छोटा कारखाना चालवायचा : आरोपी अवलहल्ली येथील त्याच्या घरी कच्चा माल वापरून प्रेशर कुकरमध्ये सिंथेटिक औषध तयार करत असे. हे औषध कर्नाटकाशिवाय इतर राज्यातही पुरवल्या जायचं. त्याला राममूर्ती नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात १०० ग्रॅम एमडीएमएसह अमली पदार्थाची विक्री करताना अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता तो अवलहल्ली येथील आपल्या घरात औषधनिर्मितीचा छोटा कारखाना चालवत असल्याचं उघड झालं.

भारतात बेकादेशीर वास्तव्य होतं : आरोपी मर्चंट व्हिसावर भारतात आला होता. त्याच्या व्हिसाची मुदत २०२२ मध्येच संपली होती. २०२१ मध्ये त्यानं कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बेंगळुरूमध्ये घर भाड्यानं घेतलं होतं. त्याला यापूर्वी हैदराबादमध्येही अटक करण्यात आल्याचं तपासात उघड झालंय. आरोपीकडून १० कोटी रुपये किमतीचे ५ किलो एमडीएमए, औषध बनवण्याचा कच्चा माल, ५ लिटरचा प्रेशर कुकर, स्टोव्ह, गॅस सिलिंडर, एक मोबाईल फोन आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध रामामूर्ती नगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा आणि विदेशी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला २० नोव्हेंबरपर्यंत ताब्यात घेण्यात आल्याचं शहर पोलिस आयुक्तांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Nagpur Crime : उपराजधानीत 84 जिवंत काडतुसांसह नऊ पिस्तुल जप्त, दोन तस्करांना ठोकल्या बेड्या
  2. Drug Seized In Mumbai: अंमली पदार्थ विरोधी पथकाचं 'ऑल आऊट ऑपरेशन' यशस्वी, ८८ लाखांचं ड्रग्ज केलं जप्त
  3. Raid On Drug Factory : सोलापूरच्या ड्रग्ज कारखान्यातून नाशिकला व्हायचा ड्रग्ज पुरवठा; लाखो रुपयांचा माल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details