हैदराबाद :सध्या उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या आहेत. यात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी रामोजी फिल्म सिटीतर्फे खास रामोजी हॉलिडे कार्निव्हलचे ( Ramoji Holiday Carnival ) आयोजन करण्यात आले आहे. हा कार्निव्हल 21 एप्रिल ते 5 जून या कालावधीत आयोजित केला जाईल. यात पर्यटकांसाठी मौजमजा आणि मनोरंजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहेत. या हॉलिडे कार्निव्हलदरम्यान पर्यटकांना बाहुबली सेटला भेट देता येईल. याचबरोबर लाइव्ह शो, स्टंट शो, फन राइड्स, स्पोर्ट्स आणि अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होता येईल.
हॅपी स्ट्रीट, कार्निवल, ईव्हनिंग फन
हॅपी स्ट्रीट - यात मजेदार खेळ, स्ट्रीट शो, लाइव्ह फूड काउंटर आणि विशेषत: सुट्टीच्या हंगामासाठी तयार केलेले DJ यांचा समावेश असेल. कार्निव्हलचे नेत्रदीपक फ्लोट्स पाहून तुमचे डोळे दिपतील. यात डान्स आर्टिस्ट, स्टिल्ट वॉकर, बांबूवर तोल सांभाळून चालणारे लोक, जोकर यांच्याही कला पाहता येतील. कार्निव्हलदरम्यान सायंकाळी केलेली चमकदार रोषणाई पर्यटकांना मंत्रमुग्ध करेल. यात पर्यटकांसाठी खास दिवसा आणि रात्री असे दोन्ही पॅकेज उपलब्ध आहे.
दिवसाचे हॉलिडे कार्निवल : (सकाळी 09.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत)
या पॅकेजमध्ये थीमॅटिक आकर्षणांचा आनंद घेता येईल. पर्यटकांना हॅप्पी स्ट्रीट तसेच नेत्रदीपक कार्निव्हल परेड याचा आनंद घेता येईल. रामोजी फिल्म सिटी हॉलिडे कार्निवलला येणारे पर्यटक नॉन एसी बसमधून प्रवास करतील. यात चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शूटिंगच्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. कार्निव्हलदरम्यान पर्यटक रामोजी फिल्म सिटीमधील खास डिझाइन केलेल्या उद्यानांनाही भेट देऊ शकतात. या पॅकेजअंतर्गत रामोजी मूव्ही मॅजिक, अॅक्शन थिएटर, स्पेस ट्रॅव्हल आणि फिल्म वर्ल्ड यासारख्या गोष्टीही अनुभवता येतील. कॉम्प्लिमेंटरी राइड्ससारखे पर्यायही उपलब्ध असतील.
पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी खास शोही तयार करण्यात आले आहेत. यामध्ये स्पिरिट ऑफ रामोजी, वाइल्ड वेस्ट स्टंट शो, डोम शो आणि लाइट्स कॅमेरा अॅक्शन यांचा समावेश आहे. इको प्रेमींसाठी बर्ड पार्क, बटरफ्लाय पार्क आणि बोन्साय गार्डनला भेट देण्याची संधी मिळेल. Fundustan मध्ये तुम्हाला मुलांसाठी आकर्षक गोष्टी मिळतील.
हॉलिडे कार्निवल स्टार - (सकाळी 09.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत)
हा प्रीमियम पॅकेज शो आहे. याअंतर्गत पर्यटकांना आकर्षक शो आणि कार्यक्रमांमध्ये एक्सप्रेस एंट्रीसह बुफे लंचचा पर्यायही मिळेल. पाहुण्यांना एसी कोचमध्ये प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. यात शूटिंग लोकेशन्स आणि पार्क्समध्ये फिरता येईल. या पॅकेजमध्ये रामोजी मूव्ही मॅजिक - अॅक्शन थिएटर, स्पेस ट्रॅव्हल आणि फिल्म वर्ल्ड यासारख्या गोष्टी देखील अनुभवता येतील.कॉम्प्लिमेंटरी राइड्ससारखे पर्यायही असतील.