महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Holi 2023 : 2023 मध्ये कधी आहे होळी ? होलिका दहनाची तारीख, शुभ वेळ आणि पौराणिक कथा जाणून घ्या

होळी हा रंगांचा सण (Holi 2023) आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. 2023 मध्ये 7 मार्च मंगळवार रोजी होलिका दहन (Holika Dahan date) आहे. आणि 8 मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे. (auspicious time and mythology)

By

Published : Dec 6, 2022, 3:34 PM IST

Holi 2023
होळी

हिंदू धर्मात होळीला खूप महत्त्व (Holi 2023) आहे. हा रंगांचा सण आहे. तो देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, होळी दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी (फागुन महिन्याची पौर्णिमा 2022) साजरी केली जाते. 2023 मध्ये 7 मार्च मंगळवार रोजी होलिका दहन (Holika Dahan date) आहे. आणि 8 मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे. (auspicious time and mythology)

होळी 2023

शुभ वेळ :फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तारीख: 6 मार्च 2023 दुपारी 4.17 वाजता पासुन सुरु होते आहे. तर फाल्गुन महिन्याचा शेवट पौर्णिमा तारीख: 7 मार्च 06:09 वाजता होतो आहे. होलिका दहन: 7 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6:24 ते 8:51 पर्यंत राहील. आणि ८ मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे.

होळी दहनाचा शुभ मुहूर्त : जेव्हा चंद्र पूर्ण अवस्थेत दिसतो तेव्हा होलिका दहन केले जाते. पंचांगानुसार यावेळी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त २ तास २७ मिनिटे आहे. होलिका दहन 7 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6:24 ते 8:51 पर्यंत करता येईल.

होळी 2023

होळीची पौराणिक कथा :पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी हिरण्यकश्यप नावाचा असुर राजा होता. गर्वाने तो स्वतःला देव म्हणू लागला होता. हिरण्यकश्यपने आपल्या राज्यात फक्त देवाचे नाव घेण्यास बंदी घातली होती आणि स्वतःला देव समजू लागला होता. पण हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवंताचा भक्त होता. दुसरीकडे, हिरण्यकश्यपची बहीण होलिका हिला अग्नीत भस्म न होण्याचे वरदान लाभले. एकदा हिरण्यकश्यपने होलिकाला प्रल्हादला तिच्या मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा दिली. पण आगीत बसलेली होलिका दगावली आणि प्रल्हाद वाचला. तेव्हापासून देवाचे भक्त प्रल्हाद यांच्या स्मरणार्थ होलिका दहन सुरू झाले. आणि भाविक होळीच्या दिवशी या पवित्र अग्निची पूजा करतात.

धूलिवंदन : 2023 मध्ये 8 मार्च बुधवार रोजी धुलिवंदन आहे. या दिवशी लोक वेगवेगळ्या रंगांची होळी खेऴून आनंद साजरा करतात. प्रत्येक राज्यात धुलिवंदन साजरी करण्याची प्रथा वेगवेगळी आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात. व खाण्यासाठी विविध पदार्थ करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details