श्रीनगर - सोमवारी संध्याकाळी श्रीनगर विमानतळावर ( Hoax bomb call Srinagar ) तणावाची स्थिती झाली. कारण, अज्ञात व्यक्तीने दिल्ली जाणाऱ्या गो फर्स्ट एअरलाइनमध्ये बॉम्ब ठेवल्याची ( Hoax bomb call Srinagar airport ) माहिती दिली.
पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, नवी दिल्ली येथील एका नंबरवरून कॉल आला होता, ज्यात दावा करण्यात आला होता की संध्याकाळी 7 वाजता उड्डाण केलेल्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर विमान कंपनीने ( Hoax bomb call airport ) सुरक्षा दलांना सतर्क केले. त्यानंतर उड्डाण थांबवून कसून शोध सुरू करण्यात आल्याचे त्यांनी ( Gofirst flight delays ) सांगितले. पण काही मिळाले नाही.
विमानात बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल- पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेबद्दल अधिक तपशील शेअर करताना, गो फर्स्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ईटीव्ही इंडियाला सांगितले की, G8 - 149 (A320-271N) हे विमान आज संध्याकाळी 7 वाजता श्रीनगरहून दिल्लीला निघणार होते. परंतु विमानात बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल आला. त्यामुळे विमानाला उशीर झाला. फोन केल्यानंतर पोलिसांना सतर्क करण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, दोन तासांहून अधिक शोध घेतल्यानंतरही काहीही सापडले नाही.