नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रेय होसाबळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये उजव्या आणि डाव्या दोन्ही विचारांना स्थान असल्याचे म्हटलं. संघातील अनेकांची मते डाव्या आणि उजव्या विचारसरणीसारखी असल्याचेही त्यांनी सांगितले. दत्तात्रेय होसाबळे यांनी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी लिहिलेल्या ''द हिंदुत्व पॅराडिग्म'' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी ते बोलेत होते.
उजव्या आणि डाव्या दोन्ही विचारांना संघात संघात स्थान आहे. कारण, हे मानवी अनुभव आहेत. मी संघात आहे. आम्ही उजव्या विचारसरणीचे आहोत, असे कधीच भाषणात म्हटलेलं नाही. आम्ची अनेक मते डाव्या विचारसरणीसारखी आहेत. तर निश्चितपणे काही तथाकथित उजव्या विचारांचीही मते आहेत, असे होसाबळे म्हणाले.
भारतीय परंपरामध्ये कोणताही पूर्णविराम नाही. भारताच्या भौगोलिक राजकारणासाठी डावी आणि उजवी या दोन्ही विचारधारा गरजेच्या आहेत. पश्चिम भाग हा पूर्णपणे पश्चिमी नाही आणि पूर्व पूर्णपणे पूर्व नाही. त्याचप्रमाणे, डावे पूर्णपणे डावे नाहीत आणि उजवे पूर्णपणे उजवे नाहीत. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणानंतर पूर्व आणि पश्चिम यांच्यातील संघर्षाच्या चर्चा फिक्या पडल्या आहेत.