ग्वाल्हेर -रविवारी हिंदू महासभेच्या सदस्यांनी गोडसे ज्ञानशाळेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात हिंदू महासभेच्या महिला व पुरुष सदस्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. ज्ञानशाळेच्या उद्घाटनानंतर कॉंग्रेस आणि भाजपमध्ये याप्रकरणी प्रतिक्रिया आल्या आहेत. आपण प्रत्येक गोष्टीला गांधींच्या चष्म्यातूनच बघायचे का, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे. तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे.
गोडसेच्या समर्थनात घोषणाबाजी -
गोडसे ज्ञानशाळा दौलतगंज येथील हिंदू महासभा कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. यावेळी गोडसेसह भाजपाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी, केशव बळीराम हेडगेवार, वीर सावरकर यांच्याही प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. यावेळी नथुराम गोडसेच्या समर्थनात घोषणाबाजीही करण्यात आली.
हे बऱ्याच दिवसांपासून सुरू -
प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण काही लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, असे कृत्य करतात जे फार काळ चालत नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते बालेंदू शुक्ला यांनी दिली आहे.