महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानात हिंदू पत्रकाराची हत्या - पाकिस्तानात पत्रकाराची हत्या

पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका हिंदू पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. अजय लालवानी असे या पत्रकाराचे नाव आहे. दरम्यान या हत्येने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानात हिंदू पत्रकाराची हत्या
पाकिस्तानात हिंदू पत्रकाराची हत्या

By

Published : Mar 20, 2021, 4:02 PM IST

इस्लामाबाद-पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका हिंदू पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. अजय लालवानी असे या पत्रकाराचे नाव आहे. दरम्यान या हत्येने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

आरोपींवर कठोर कारवाई करावी

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अजय लालवानी हे कटिंग करण्यासाठी एका सलूनच्या दुकानामध्ये गेले होते. याच दरम्यान अज्ञान आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. लालवानी यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. दरम्यान त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करत असताना, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना अजय यांच्या वडिलांनी म्हटले की माझ्या मुलाची कोणासोबतही दुश्मनी नव्हती, मात्र तरी देखील त्याची हत्या करण्यात आली. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

हेही वाचा -धक्कादायक! मादी श्वानावर लैंगिक अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details