मुंबई -'हिंदू धर्म आणि हिंदुत्व दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते एकच असल्यास त्यांचे नावही एकच असते. असे सूचक विधान राहुल गांधींनी केले.कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या जन जागरण अभियानात ते बोलत होते. यावेळेस त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्व यातील फरक समजावून सांगितला. काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकावरून सध्या मोठा वादंग झाल्यावर राहुल गांधी त्यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत.
'हिंदू धर्म म्हणजे शीखांना मारणे किंवा मुस्लिमांना मारणे आहे का ? हे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे? मी उपनिषदे वाचली आहेत पण पाहिली नाहीत. तुम्ही एका निरपराध माणसाला मारले असे कुठे लिहिले आहे? असाही सवालही त्यांनी केला. खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांसोबत केल्याने भाजप आणि शिवसेनेकडून तीव्र आक्षेप घेण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये सलमान खुर्शिद यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.
'
चीनी कम्युनिस्ट यांचे उदाहरण देत सांगितला फरक
यावेळेस राहुल गांधी यांनी चिनी कम्युनिस्ट यांचे उदाहरण दिले. एका वेळेस चीनचे नेते आले होते. मी त्यांना विचारले की, तुम्ही कम्युनिस्ट आहात. मग कम्युनिस्ट मध्येही चिनी विचारसरणीचे आहात. तुम्ही सांगा की, तुमच्यात दोन्ही वैशिष्टये असू शकत नाही. जर तुम्ही कम्युनिस्ट आहात तर तुम्हाला कम्युनिस्ट म्हटले पाहिजे. हे खूपच सरळ विचारसरणी आहे. तुम्ही हिंदू असाल तर हिंदू विचारसरणीची गरज काय ? एका नव्या नावाची काही गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.