महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 4, 2021, 6:44 AM IST

ETV Bharat / bharat

हिंदी भाषा देशाला जोडून ठेवते; सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

हिंदी भाषा ही देशाला जोडून ठेवते, असे मत सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी व्यक्त केले. ते गुजरातच्या नवसारीमध्ये बोलत होते. याठिकाणी 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती होती...

Hindi is the language that unites India: Sikkim CM
हिंदी भाषा देशाला जोडून ठेवते; सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

गांधीनगर : हिंदी भाषा ही देशाला जोडून ठेवते, असे मत सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी व्यक्त केले. ते गुजरातच्या नवसारीमध्ये बोलत होते. याठिकाणी 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती होती.

हिंदी ही राष्ट्रभाषा असून, ती देशाला एकत्र आणते. तसेच, राष्ट्रभक्तांना आपले विचार सर्वत्र पसरवण्यास मदत करते, असे तमंग यावेळी म्हणाले.

७५व्या स्वातंत्र्यदिनासाठी कार्यक्रम..

पुढील वर्षी भारत ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने केंद्र सरकारने 'आझादी का अमृत महोत्सव' उपक्रम लॉंच केला आहे. यापूर्वी दांडी यात्रेला १०० वर्ष झाल्याच्या निमित्तानेही केंद्राने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासाठीच साबरमती आश्रमातून दांडीपर्यंत एक पदयात्राही आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा शनिवारी नवसारीमध्ये पोहोचली.

हेही वाचा :भाजपा नेत्यांची हॉटेलमधून जेवण मागवून दलिताच्या घरी जेवण्याची नौटंकी, ममता दीदींचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details