महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Hindi Diwas २०२३ : 'हिंदी दिवस' का साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व - हिंदीचा स्वीकार करण्याचा दिवस

हिंदी ही केवळ भारताची राष्ट्रभाषा नाही तर ती देशाच्या अस्मितेचं आणि अभिमानाचं प्रतीक आहे. दरवर्षी भारत 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा करतो. हा दिवस हिंदी भाषेचं महत्त्व दर्शवतो आणि तरुण पिढीला ही भाषा अधिकाधिक अंगीकारण्याची प्रेरणा देतो.

Hindi Diwas 2023
हिंदी दिन

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 10:14 AM IST

Updated : Sep 14, 2023, 1:25 PM IST

हैदराबाद : हिंदी भाषेचे महत्त्व आणि तिच्या समृद्ध वारशाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतात दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी 'हिंदी दिवस' 2023 साजरा केला जातो. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. कारण या दिवशी 1949 मध्ये संविधान सभेने हिंदी ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली होती. हा दिवस हिंदी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून जगभर जनजागृती करण्याचा आणि देशातील अधिकृत भाषांपैकी एक म्हणून हिंदीचा स्वीकार करण्याचा दिवस आहे. याशिवाय याच दिवस इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ आणि धर्मशास्त्रज्ञ राजेंद्र सिम्हा यांची जयंती आहे. ज्यांनी हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा म्हणून विकसित करण्यात मोठं योगदान दिलं. हिंदी दिवस केवळ भाषेबद्दल जागरूकता पसरवत नाही तर तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्याची संधीसुद्धा मिळवून देतो.

'हिंदी दिवसा'चा इतिहास : 'हिंदी दिवस' पहिल्यांदा 14 सप्टेंबर 1949 रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी भारताच्या संविधान सभेनं हिंदीला भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक म्हणून स्वीकारलं. मँडरीन आणि इंग्रजी नंतर हिंदी ही जागतिक स्तरावर तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, ही भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 43.6 टक्के आहे. हिंदी शब्द 'हिंद' या पर्शियन शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ 'सिंधूची भूमी' आहे. हिंदी भाषा ही भारताची आणि नेपाळ, फिजीसारख्या देशांची वारसा मानली जाते. टोबॅगो, गयाना, मॉरिशस, त्रिनिदाद आणि सुरीनाम येथे मोठ्या संख्येनं हिंदी भाषिक आहेत.

'हिंदी दिवसा'चे महत्त्व :14 सप्टेंबर हा हिंदी भाषेच्या सन्मानार्थ 'हिंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक शाळा आणि सांस्कृतिक संस्था हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. यासाठी सरकारी कार्यालयांमध्येही हिंदी भाषेचा वापर करण्यास सांगितलं जातं. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या दिवशी हिंदी भाषा पुरस्कारही दिले जातात. 'हिंदी दिवसा'निमित्त भारताचे राष्ट्रपती हिंदी भाषेच्या क्षेत्रात काहीतरी मिळविलेल्या सर्वांचा सन्मान करतात. 'हिंदी दिवस' हा पंधरा दिवस साजरा केला जातो. हा कालावधी 'हिंदी पंधरवडा' म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा :

  1. World Literacy Day 2023 : जागतिक साक्षरता दिन 2023; जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस...
  2. World physiotherapy Day 2023 : जागतिक फिजिओथेरपी दिवस २०२३; जाणून घ्या काय आहे इतिहास...
  3. World Suicide Prevention Day २०२३ : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2023; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व...
Last Updated : Sep 14, 2023, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details