शिमला : हिमाचल प्रदेशात 40 जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचे आमदार आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी पोहोचू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांच्यासह काही आमदार पोहोचले आहेत. कॉंग्रेसने राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे. (Himachal Pradesh Congress leaders meet Governor). मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रतिभा सिंह, सुखविंदर सिंग सुक्खू आणि मुकेश अग्निहोत्री यांची नावे आघाडीवर आहेत. (Himachal Congress Legislature Party meeting) (Congress Legislature Party meeting in Shimla).
Himachal Congress Meeting : हिमाचल काँग्रेसची बैठक, मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा - Congress Legislature Party meeting in Shimla
हिमाचल काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू झाली आहे. (Congress Legislature Party meeting in Shimla). शिमला येथील काँग्रेस कार्यालय राजीव भवन येथे होणाऱ्या या बैठकीत काँग्रेसचे आमदार हिमाचलच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर अंतिम निर्णय घेतील. (Himachal Congress Legislature Party meeting)
प्रतिभा सिंह चार आमदारांसह पोहोचल्या : मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी प्रतिभा सिंह चार आमदारांसह पोहचल्या. प्रतिभा सिंह यांच्यासह आमदार राजेंद्र राणा, धनीराम शांडिल, मोहन लाल ब्रगटा आणि नंद लाल हे देखील होते. याशिवाय रघुबीर बाली सुंदर ठाकूर, इंदर दत्त लखनपाल, रोहित ठाकूर, कुलदीप पठानिया, नीरज नय्यर, सुखविंद सिंग सुखू, अनिरुद्ध सिंग यांच्यासह 20 काँग्रेस आमदार पोहोचले आहेत.
काँग्रेसला ४० जागा मिळाल्या : हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले. हिमाचलमध्ये काँग्रेसने 68 पैकी 40 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने 25 जागा जिंकल्या. 3 जागा अपक्षांच्या खात्यात गेल्या आहेत. 1985 पासून कोणत्याही पक्षाला हिमाचलमध्ये सरकारची पुनरावृत्ती करता आलेली नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर हिमाचलमध्ये सत्ताबदल होतो आहे. यावेळी भाजपने ही प्रथा मोडणार असल्याचा दावा केला होता, मात्र काँग्रेसने विजय मिळवत ही प्रथा कायम ठेवली आहे.