शिमला : सुखविंदर सिंह सुक्खू यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. (Himachal CM Sukhvinder Singh sukhu took charge). तत्पूर्वी ते सचिवालयात पोहोचताच पोलिसांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्रीही पोहोचले. मुकेश अग्निहोत्री यांनीही आजच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. (Himachal Deputy CM Mukesh Agnihotri took charge)
हिमाचलमध्ये पारदर्शकता कायदा आणला जाईल :यावेळीमुख्यमंत्री सुखविंदर सिंह म्हणाले की, पहिल्या कॅबिनेट बैठकीत निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल. यासोबतच राज्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लवकरच पारदर्शकता कायदा आणला जाणार आहे. मला जनतेची सेवा करण्याची एवढी मोठी संधी मिळेल असे वाटले नव्हते. तसेच हायकमांडच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी ज्येष्ठ नेते कौलसिंग ठाकूर, कुलदीपसिंग राठौर, विद्या स्टोक्स यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.