हैदराबाद- गोव्यामध्ये दोन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. अल्पवयीन रात्री का बाहेर थांबल्या होत्या, त्यांच्या आई-वडिलांची जबाबदारी असते, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले होते. यापूर्वीही महिलांवरील अत्याचारानंत अनेक राजकीय नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. असे नेते व त्यांच्या विधानांची माहिती घेऊ.
तीर्थ सिंह रावत
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांनी पदभार स्वीकारताच वादग्रस्त विधाने करण्यास सुरुवात केली. गुडघ्याजवळ फाटलेल्या जीन्सचा संबंध रावत यांनी संस्काराशी जोडला होता. त्यानंतर सोशल मीडियामध्ये रावत यांच्यावर खूप टीका झाली होती.
हेही वाचा-भारत-चीनमधील कॉर्पस कंमाडर पातळीवरील चर्चा विधायक
मुलायम सिंह यादव
बलात्कार प्रकरणावरून समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी कायद्यात बदल करण्याची मागणी करत मोर्चा काढला होता. जेव्हा मुलगा व मुलीमध्ये मतभेद होतात, तेव्हा मुलगी बलात्कार झाल्याचे सांगते. त्यानंतर बिचाऱ्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावली जाते. बलात्कार प्रकरणात फाशी द्यावी का ? मुलाकडून चूक होत असते.
शरद यादव
शरद यादव हे 2017 म्हणाले होते, मतांची अब्रु ही मुलींच्या अब्रुहून मोठी असते. जर मुलीला अब्रु दिली तर केवळ गाव आणि गल्लीला अब्रु दिली जाईल. मात्र, एक मतदान विकले तर संपूर्ण देशाची अब्रू विकले जाईल.
हेही वाचा-#JeendeDo गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वचस्तरातून टीका, जाणून घ्या, प्रतिक्रिया