हैदराबाद :वायएसआरटीपीच्या (YSRTP) प्रमुख वाय.एस शर्मिला आंदोलनासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या अधिकृत निवासस्थान असणाऱ्या प्रगती भवनाबाहेर पोहोचल्या. त्यानंतर त्याठिकाणी जोरदार राडा झाला. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी वाय.एस शर्मिला यांना ताब्यात ( Ysrtp Chief YS Sharmila Arrested) घेतलं.
Telangana : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या निवासस्थानाबाहेर राडा, वायएसआरटीपीच्या प्रमुख नजरकैदेत - कथित हल्ला
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर (K. Chandrashekhar Rao) यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर राडा झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान, वायएसआरटीपीच्या (YSRTP) प्रमुख नजरकैदेत आहेत.
![Telangana : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या निवासस्थानाबाहेर राडा, वायएसआरटीपीच्या प्रमुख नजरकैदेत Telangana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17064482-thumbnail-3x2-telangana.jpg)
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या निवासस्थानाबाहेर राडा, वायएसआरटीपीच्या प्रमुख नजरकैदेत
काय आहे प्रकरण ?काल वारंगळमध्ये टीआरएस (Telangana Rashtra Samiti) कार्यकर्त्यांनी वायएसआरटीपीच्या (YSRTP) प्रमुख वाय.एस शर्मिला यांच्यावर केलेल्या कथित हल्ल्याचा निषेध करत आहेत. त्यानंतर वाय.एस शर्मिला यांना समर्थकांसह हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. वायएस शर्मिला यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या कॅम्प ऑफिसबाहेर स्वत:ला कारमध्ये लॉक केल्यामुळे, पोलिसांना शर्मिला यांची कार खेचून घ्यावी लागली. त्यांना एस आर नगर येथे हलवण्यात आले.