नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने लसीकरणाचे आवाहन करणारी डायलर ट्यून ही त्रासदायक असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती विपीन संघी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले, की ही ट्यून कधीपासून वाजत असल्याची माहिती नाही. तुमच्याकडे पुरेशी लस नाही. तरीही लसीकरण करा असल्याचे सांगत आहात. लस नसताना लसीकरण कसे करायचे असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.
सरकारने एकच कॉलर ट्यून ठेवण्याऐवजी परिस्थितीनुसार विविध कॉलर ट्यून करण्याची गरज आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. जर लोक वेगवेगळे संदेश ऐकू शकले तर त्यांना मदत होऊ शकेल. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तींची मदत घेतली जाऊ शकते, असा सल्ला दिल्ली उच्च न्यायालयाने दिला.
हेही वाचा-'लव्ह यू जिंदगी' म्हणाऱ्या तरुणीचा कोरोनाने घेतला बळी; नेटकरी झाले भावूक