अलाहाबाद - देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागली ( Omicron in India ) आहेत. वाढत असलेला ओमायक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेता अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरेक्षाबाबत चिंता व्यक्त केली. न्यायालायने पंतप्रधान आणि देशाच्या निवडणूक आयुक्तांना उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या लाटेपासून जनतेचे संरक्षण करण्याासाठी उपाययोजना करण्यास सांगितले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रशासनाला विनंती केली, की राजकीय पक्षांना गर्दी जमवून निवडणूक रॅली काढण्यास मनाई ( Ban Rallies in UP Elections ) करण्यात यावी. तसेच राजकीय पक्षांना टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रचार करण्यास सांगावे. प्रशासनाने पक्षांच्या निवडणूक सभा आणि रॅली रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत. शक्य असल्यास निवडणूक पुढे ढकलण्याचाही विचारही करावा. कारण प्राण आहे तर जग आहे, असे न्यायालयाने म्हटलं.