खातिमा : खालिस्तानी समर्थक आणि 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल आणि त्याच्या चार साथीदारांच्या शोधात पंजाब पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. असे असूनही त्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. त्याचवेळी अमृतपाल आणि त्याचे चार साथीदार नेपाळला पळून जाऊ शकतात, अशीही माहिती पंजाब पोलिसांना मिळाली आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी उत्तराखंडमधील नेपाळला लागून असलेल्या सीमावर्ती भागात तपासणी वाढवली आहे. उधम सिंहनगर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अमृतपाल आणि त्याच्या चार साथीदारांचे पोस्टर विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.
उत्तराखंड पोलिसांकडून हाय अलर्ट जारी :पंजाब पोलिसांनी फरार घोषित केलेल्या अमृतपाल आणि त्याच्या चार साथीदारांबाबत उत्तराखंड पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. अमृतपाल त्याच्या साथीदारांसह नेपाळला पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती उत्तराखंड पोलिसांना मिळताच नेपाळ सीमेवर तपासणी वाढवण्यात आली. उत्तराखंडमधील उधम सिंहनगर आणि चंपावत जिल्ह्याला नेपाळची सीमा आहे. अशा परिस्थितीत उत्तराखंड पोलीस नेपाळ सीमा भागात विशेष खबरदारी घेत आहेत. हॉटेल आणि गेस्ट हाऊस व्यतिरिक्त सर्व सार्वजनिक ठिकाणी अमृतपालच्या शोधासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे.
अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांचे पोस्टर्सही ठिकठिकाणी :उधम सिंहनगरचे एसएसपी त्यांच्या टीमसह नेपाळ सीमेवर नानकमट्टा, खातिमा आणि झनकैया पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालत आहेत. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांचे पोस्टर्सही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. यासोबतच लोकांना संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तत्काळ त्याची माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. पोलीस त्यांची माहिती गोपनीय ठेवतील. याशिवाय खलिस्तानी समर्थकांना जर कोणी मदत केली किंवा त्यांना आश्रय देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम त्यांनाही भोगावे लागतील, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लुक आऊट नोटीस आणि अजामीनपात्र वॉरंटही जारी :पंजाब पोलिसांनी खलिस्तानी समर्थक आणि 'वारिस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख अमृतपाल यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस आणि अजामीनपात्र वॉरंटही जारी केले आहे. सुरक्षा यंत्रणांनी सर्व विमानतळांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. गेल्या चार दिवसांपासून पंजाब पोलीस अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांच्या शोधात इकडे-तिकडे चकरा मारत आहेत, पण त्यांना त्याच्याबद्दल कोणताही सुगावा लागू शकलेला नाही.
हेही वाचा : C-20 Representatives : पेंच सफारीत वाघोबाच्या दर्शनाने भारतात आलेले सी-20 प्रतिनिधी रोमांचित; पाहा फोटो