महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Jagtial News : अहो साहेब आमच्या गावात दारूची विक्री होत नाही; तरुणाने लिहिले थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - complaint that Kingfisher beers

तेलंगानातील एका व्यक्तीने चक्क जिल्हाधिकाऱ्यांना पिण्यासाठी दारु मिळत नसल्याची तक्रार केली आहे. जगतियाल जिल्ह्यात बिअरची विक्री सुरू करण्याची विनंती त्यांने जिल्हाधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात करण्यात आली आहे. बीरम राजेश असे या तरुणाचे नाव असुन त्यांनी दारुच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे.

Jagtial News
Jagtial News

By

Published : Feb 28, 2023, 8:33 PM IST

हैदराबाद :तेलंगाणात एका व्यक्तीने जिल्हाधिकारी कर्यालयात तक्रार दाखल केली आहे. या अनोख्या तक्रारीने सगळेच आश्चर्यचकीत जाले आहे. या तक्रारीमुळे जगतियाल जिल्हाधिकारी कार्यालयातील 'प्रजा वाणी' या तक्रार कक्षात जोरदार चर्चा सुरू आहे. बीरम राजेश या तरुणाने थेट जिल्हधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे की, शहरात किंगफिशर बिअरची विक्री नाही. यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील कोरुटला, धर्मापुरी येथे सर्व प्रकारच्या ब्रँडच्या बिअरची विक्री होत असली तरी जगत्येत मात्र, निकृष्ट दर्जाच्या बिअरची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे.

किंगफिशर बिअर मिळत नाही :जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी होणाऱ्या प्रजा वाणी कार्यक्रमात आपण जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक समस्या किंवा वैयक्तिक कौटुंबिक समस्यांबाबत प्रश्न सोडवतांना दिसतात. मात्र काल जगत्याला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रजा वाणी कार्यक्रमात एक विचित्र तक्रार आली. समस्यांव्यतिरिक्त, जगत्याला येथील बीरम राजेश नावाच्या तरुणाने अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एस. लता यांच्याकडे तक्रार केली की त्यांना त्यांच्या आवडीची किंगफिशर बिअर मिळत नाही. सध्या हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

जिल्हाधिकाऱ्याचे प्रश्न सोडविण्याचे आदेश : निकृष्ट दर्जाच्या मद्यपानामुळे पिणाऱ्यांना अनेक आजार होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. शिवाय काही ठीकाणी बनावट दारुची विक्रि होत असून नागरिकांना लुटले जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. या तक्रारीला उत्तर देताना अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एस.लथा यांनी उत्पादन शुल्क अधीक्षकांशी बोलून प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले आहे.

बनावट दारूचा सुळसुळाट : बीरम राजेश यांनी तक्रारीत लिहले आहे की,'जगत्याला प्रजावानीमधील माझी तक्रार कोणालाही हास्यास्पद वाटू शकते. तुम्हाला या तक्रारीवरुन वाटेल की मी दारूडा आहे. पण निकृष्ट दर्जाच्या दारू विक्रीमुळे अनेकांना युरिक इन्फेक्शन होत आहे. जगत्याला सिंडिकेटमध्ये बनावट दारू विकली जात आहे. मी याबाबत प्रजावणी येथे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.


पट्टा दुकानांवर विरोधकांची टीका :तेलंगणात किराणा दुकाने वाढत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. नुकतेच भाजपचे आमदार रघुनंदर राव यांनी विधानसभेच्या बैठकीत या विषयावर भाष्य केले. त्यांनी तेलंगणा सरकारवर टीका केली होती. तेलंगणा सरकारने महसूल वाढवण्यासाठी उत्पन्नाचा स्रोत म्हणून दारूच्या विक्रिला परवानगी देणे चुक आहे. प्रत्येक गावातील किराणा दुकानांचे रूपांतर दारूच्या दुकानांमध्ये झाले आहे, त्यामुळे राज्य सरकारने दारूव्यतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा दुसरा मार्ग शोधला पाहिजे. राज्य सरकार दारूचे उत्पन्न वाढवण्यावर भर देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

हेही वाचा -Robot Elephant : तुम्ही कधी रोबोटीक हत्ती पाहिला का? भारतात पहिल्यांदा धार्मिक विधी करण्यासाठी रोबोटीक हत्तीचा वापर

ABOUT THE AUTHOR

...view details