नवी दिल्ली - हेरॉईनची तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पर्दाफाश केला आहे. स्पेशल सेलने टोळीमधील चार आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी ३५० किलो हेरॉईन जप्त केली आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात २५०० कोटी किंमत असल्याचे सांगितले जात आहे.
स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाहा म्हणाले, की गुप्त माहितीनुसार चार आरोपींना अटक केली आहे. पोलीस तस्करीचे पाळेमुळे शोधत आहोत. तस्करीतील नेटवर्कशी संबंधित लोकांची चौकशी करण्यात येत आहे. आरोपी दिल्लीमध्ये केव्हापासून तस्करी करत आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अटकेतील आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आरोपींचे तस्करीचे जाळे कुठवर आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाची घेणार बैठक