चेन्नई : भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांचे बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे विमान अपघातात (Chopper Crash) निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नीसह १२ जणांचा मृत्यू झाला. आज भारतीय वायुसेना प्रमुख (IAF Chief) एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी (Air Chief Marshal VR Chaudhari) कुन्नूर येथे घटनास्थळी पोहोचले आहेत. तामिळनाडूचे डीजीपी सी सिलेंद्र बाबू देखील वायुसेना प्रमुखांसह उपस्थित होते. दरम्यान एअर मार्शल मानवेंद्र सिंग हे काल क्रॅश झालेल्या IAF Mi-17 च्या त्रि-सेवा चौकशीचे नेतृत्व करत आहेत.
तेथे या दोघांनीही अपघाताची माहिती घेतली. वायुदल प्रमुख बुधवारीच पालम येथून तामिळनाडूला रवाना झाले होते. जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि इतर सर्व 11 लोकांचे पार्थिव आज लष्करी विमानाने तामिळनाडूहून दिल्लीत आणले जात आहे. शुक्रवारी, दोघांचे मृतदेह त्यांच्या घरी आणले जातील आणि लोकांना सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत त्यांचे अंतिमदर्शन घेता येईल. त्यानंतर स्मशानभूमी घाटापर्यंत त्यांची अंतिम यात्रा निघणार आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांची धाकटी बहीण आणि भाऊही तेथे उपस्थित राहणार आहेत.