महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कृष्ण जन्मभूमी- शाही ईदगाह वाद प्रकरणी दोन याचिकांवर आज सुनावणी

कृष्ण जन्मभूमी- शाही ईदगाह वाद प्रकरणी दोन याचिकांवर आज सुनावणी होणार ( krishna janmabhoomi shahi idgah dispute case ) आहे. याचिकाकर्त्याने शाही इदगाह मशिदीचे सर्वेक्षण करून कोर्ट कमिशनर नेमण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे महेंद्र प्रताप सिंह यांच्या याचिकेवरही आज सुनावणी होणार ( mathura krishna janmabhoomi case ) आहे.

krishna janmabhoomi shahi idgah dispute case
कृष्ण जन्मभूमी- शाही ईदगाह वाद प्रकरणी दोन याचिकांवर आज सुनावणी

By

Published : Jul 5, 2022, 8:41 AM IST

मथुरा ( उत्तरप्रदेश ) : श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणातील दोन याचिकांवर आज मथुरेतील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात सुनावणी होणार ( krishna janmabhoomi shahi idgah dispute case ) आहे. भगवान कृष्णाचे वंशज मनीष यादव यांच्या याचिकेवर आणि अन्य एका प्रकरणावर सुनावणी होणार आहे. नुकतेच कोर्टाला सुट्टी असल्याने या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. याचिकाकर्त्याने न्यायालयात अर्ज दाखल करताना शाही इदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करून न्यायालयीन आयुक्त नियुक्त करण्याची मागणी केली ( mathura krishna janmabhoomi case ) आहे.

दोन याचिकांवर सुनावणी : श्री कृष्णजन्मभूमीच्या दोन याचिकांवर आज जिल्ह्यातील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. नारायणी सेनेचे अध्यक्ष श्री कृष्णजन्मभूमीचे प्रमुख पक्षकार मनीष यादव यांनी गेल्या वर्षी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. शाही इदगाह मशीद संकुलातील वादग्रस्त जागेचे स्पॉट सर्व्हे करून कोर्ट कमिशनरची नियुक्ती करावी, कारण मशिदीच्या आवारात हिंदू सनातन धर्माचे प्रतीके कोरलेले आहेत, अशी मागणी करण्यात आली. काही लोक तेथून ही चिन्हे हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज खटला क्रमांक 152 वर सुनावणी होणार आहे. महेंद्र प्रताप सिंग यांच्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे.

ही आहे सद्यस्थिती : श्री कृष्ण जन्मस्थान कॉम्प्लेक्स 13.37 एकरवर बांधले आहे. श्री कृष्ण जन्मभूमी लीला मंच, 11 एकरमध्ये भागवत भवन आणि 2.37 एकरमध्ये शाही इदगाह मशीद आहे. श्री कृष्णाचे जन्मस्थान हे प्राचीन कटरा केशव देव मंदिराच्या जागेवर बांधलेले आहे. कोर्टात दाखल झालेल्या सर्व अर्जांमध्ये ही संपूर्ण जमीन भगवान कृष्णजन्मभूमीला परत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 1968 मध्ये श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि श्री कृष्ण जन्मभूमी सेवा ट्रस्ट यांच्यात करार झाला होता.

हेही वाचा :श्रीकृष्ण जन्मभूमीवरील मशीद हटविण्यासंबंधीची याचिका मथुरा न्यायालयाने स्वीकारली

ABOUT THE AUTHOR

...view details