नवी दिल्ली: दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कथित शेतकऱ्यांशी संबंधित असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (BJP) यांनी महानगर दंडाधिकारी यांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. भाजप राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरुद्धच्या एफआयआरवर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धीरज मोरे करणार आहेत.
15 डिसेंबर 2021 रोजी सत्र न्यायालयाने संबित पात्रा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याच्या महानगर दंडाधिकार्यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. 23 नोव्हेंबर रोजी महानगर दंडाधिकारी ऋषभ कपूर यांनी संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या आतिशी मार्लेना यांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, संबित पात्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अरविंद केजरीवाल यांच्याबाबत शेतकऱ्यांशी संबंधित एक भडकाऊ व्हिडिओ पोस्ट केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, बनावट व्हिडिओ अपलोड करून संबित पात्रा यांनी अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमुळे सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे.