महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Coronil controversy : बाबा रामदेवच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्ट करणार सुनावणी

मागील 30 जुलैला बाबा रामदेवने नोटीस जारी केली होती. या याचिकेत डॉक्टर तसेच विज्ञानाच्या दाव्याला आव्हान दिले आहे. त्यांच्या या विधानामुळे लोकांचे नुकसान होत आहे. ते वैद्यकीय गोष्टींना आव्हान देत आहेत. या याचिकेत बाबा रामदेव एक प्रभावशाली व्यक्तीमत्व आहे. आणि त्यांचे विधान अनेक लोकांना प्रेरणा देते असेही, यात नमूद केले आहे.

baba ramdev
baba ramdev

By

Published : Aug 16, 2021, 12:18 PM IST

नवी दिल्ली - बाबा रामदेव कोरोनिल औषधाबाबत केलेल्या खोट्या दाव्याला स्थगिती देण्याच्या एम्सच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. न्यायमूर्ती सी हरिशंकर यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

मागील 30 जुलैला बाबा रामदेवने नोटीस जारी केली होती. या याचिकेत डॉक्टर तसेच विज्ञानाच्या दाव्याला आव्हान दिले आहे. त्यांच्या या विधानामुळे लोकांचे नुकसान होत आहे. ते वैद्यकीय गोष्टींना आव्हान देत आहेत. या याचिकेत बाबा रामदेव एक प्रभावशाली व्यक्तीमत्व आहे. आणि त्यांचे विधान अनेक लोकांना प्रेरणा देते असेही, याचिकेत नमूद केले आहे.

काय सुरू आहे वाद

गेल्या काही दिवसांपासून बाबा रामदेव आणि अॅलोपथी डॉक्टरांची संस्था आयएमए यात वाद सुरू आहेत. अॅलोपथी औषधावर बाबा रामदेव यांनी वादग्रस्त विधान दिले होते. केंद्रीय स्वास्थ मंत्र्यांनीही बाबा रामदेव यांना हे विधान मागे घेण्यास सांगितले होते. आयएमएने बाबा रामदेवविरुध्द कायेदशीर नोटीस पाठवली होती. 1 जूनला देशभरातील अॅलोपथी डॉक्टरांनी त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी काळी पट्टी बांधून काम केले होते.

हेही वाचा -जेसिका लाल यांची बहिण सबरीना लाल यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details