महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Hearing Gyanvapi Case : ज्ञानवापी मशीद शृंगार गौरी प्रकरणाची आज सुनावणी - Gyanvapi Sringar Gauri case

ज्ञानवापी मशीद शृंगार गौरी प्रकरणाची ( Gyanvapi Masjid Shringar Gauri Case ) आज वाराणसी जिल्हा न्यायालयात ( Gyanvapi case Varanasi District Court ) सुनावणी होणार आहे. या खटल्यात पक्षकार होण्यासाठी दिलेल्या याचिकांवर जिल्हा न्यायाधीश सुनावणी ( hearing of gyanvapi case ) करणार असून त्यात सुमारे १८ जणांचा समावेश आहे.

Hearing Gyanvapi Case
ज्ञानवापी मशीद शृंगार गौरी प्रकरण

By

Published : Sep 29, 2022, 11:06 AM IST

वाराणसी : ज्ञानवापी मशीद शृंगार गौरी प्रकरणाची Gyanvapi Masjid Shringar Gauri Case ) सुनावणी आज पुन्हा एकदा वाराणसी जिल्हा न्यायालयात ( Gyanvapi case Varanasi District Court ) दुपारी 2 वाजता होणार आहे. शृंगार गौरी नियमित दर्शनासाठी दाखल करण्यात आलेल्या 5 महिलांची याचिका जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या कोर्टाने मान्य करून त्यावर सुनावणी ( hearing of gyanvapi case ) घेणार असल्याचे म्हटले होते.

18 होणार पक्षकार -आज जिल्हा न्यायाधीशांनी या प्रकरणात पक्षकार होण्यासाठी दिलेल्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. ज्यामध्ये सुमारे 18 लोक सहभागी होतील. त्यांनी या प्रकरणात पक्षकार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय, आयोगाच्या कामकाजादरम्यान वाजुखान्यात सापडलेल्या तथाकथित शिवलिंगाबाबतही वादी महिलांचे वकील विष्णू शंकर जैन यांच्या वतीने मागील सुनावणीदरम्यान न्यायालयात अपील करण्यात आले होते. त्यात त्यांनी या शिवलिंगाची कार्बन डेटिंग, इतर तपासाची मागणी केली होती. ज्याची आज जिल्हा न्यायाधीश न्यायालयातही सुनावणी होणार आहे.

हिंदू पक्षकारांत फुट - सध्या शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगच्या मागणीवरून हिंदू पक्षकारांत देखील फुट पडली आहे. चार फिर्यादी महिलांचे वकील विष्णू जैन यांनी कार्बन डेटिंगची मागणी केली आहे, तर विश्व वैदिक सनातन संघाच्या वतीने जितेंद्र सिंह बिसेन, राखी सिंह यांनी या चाचणीला विरोध केला आहे. जितेंद्र सिंह म्हणतात की, शिवलिंगाच्या चौकशीची मागणी केली तर लोकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. त्यामुळे ही चाचणी करू नये अशी त्यांची मागणी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details