गंगापूर/बंसवाडा (राजस्थान) : राजस्थानमधील वैद्यकीय सुविधांची चिंताजनक स्थिती (Health System in Rajasthan) दर्शवणारे दोन वेगवेगळे व्हिडिओ शनिवारी समोर आले. (Health System in Rajasthan on Ventilator). पहिल्या व्हिडिओमध्ये, सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर येथून, रुग्णालयातील कर्मचारी कचरा व्हॅनवर मृतदेह भरताना दिसत आहेत (Rajasthan bodies in garbage van Sawai Madhopur), तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये रुग्णाचे नातेवाईक डिझेल संपल्याने रुग्णवाहिकेला धक्का देत असल्याचे दिसत आहे. (Patient family pushes ambulance Banswara)
Health System : आरोग्य व्यवस्था व्हेंटीलेटरवर! दोन वेगवेगळ्या घटनांमधून सत्य झाले उघड - नातेवाईक डिझेल संपल्याने रुग्णवाहिकेला धक्का
पहिल्या घटनेत, सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर येथील रुग्णालयातील कर्मचारी मृतदेह कचरा व्हॅनमध्ये घेऊन गेले, (Rajasthan bodies in garbage van Sawai Madhopur), तर दुसऱ्या घटनेत रुग्णाच्या नातेवाईकांनी डिझेल संपल्याने रुग्णवाहिकेला धक्का दिल्याची बातमी समोर आली आहे.(Patient family pushes ambulance Banswara)
पहिली घटना : पहिली घटना शहरातील गंगापूर सामान्य रुग्णालयाच्या आवारात घडली. येथे लोकांचा एक गट दोन बेवारस मृतदेह नगर परिषदेच्या मालकीच्या कचरा व्हॅनमध्ये अंतिम संस्कारासाठी घेऊन जाताना दिसतो आहे. रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या या मृतदेहांमध्ये एक पुरुष आणि एक महिला असल्याचे समजते. या घटनेची चौकशी केली असता आमदार रामकेश मीणा यांनी ही घटना 'लज्जास्पद' असल्याचे सांगून आपण त्याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. "हे घडले याची मला लाज वाटते आणि याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार प्रयत्न करेन," ते म्हणाले. "दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. अंतिम संस्कार गंगापूर महानगरपालिकेद्वारे केले जातील," असे एसआय जीआरपी हजारी लाल यांनी सांगितले. तथापि त्यांनी संबंधित क्लिपवर भाष्य करण्यास नकार दिला.
दुसरी घटना : राज्यातील बांसवाडा जिल्ह्यात एका वेगळ्या घटनेची व्हायरल क्लिप समोर आली आहे. यामध्ये रुग्णाचे नातेवाईक इंधन संपल्याने रुग्णवाहिकेला ढकलताना दिसत आहेत. तेजपाल गणवा या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना ही घटना घडली. गणवा यांचे जावई मुकेश म्हणाले, विलंबानंतर दुसऱ्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. "माझ्या वडिलांची तब्येत रात्री 11 च्या सुमारास बिघडली. 12:15 वाजता रुग्णवाहिका आली, परंतु रुग्ण दुपारी 3 वाजता रुग्णालयात पोहोचला. तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले," असे मुकेश यांनी सांगितले. घटनेबाबत सीएमएचओ एचएल तबियार म्हणाले की, ते मृताच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार आहेत. मी त्यांना भेटून कुठे चूक झाली आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करेन, असे ते म्हणाले. ही रुग्णवाहिका सेवा खाजगी एजन्सीद्वारे राज्य सरकारच्या सहकार्याने चालविली जात होती. 108 हेल्पलाइन सेवा देखील एजन्सीद्वारे चालवली जाते. ते वाहनांची देखभाल करतात. याबाबत निष्काळजीपणा आढळल्यास प्रशासकीय कारवाई केली जाईल," असे ते शेवटी म्हणाले.
TAGGED:
Health System in Rajasthan