महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मिझोरम : जगातील सर्वात मोठ्या कुटुंबातील प्रमुखाचे निधन - जगातील सर्वात मोठे कुटुंब

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख जिओना चाना यांचे रविवारी निधन झाले. जिओना चाना यांच्या कुटुंबात 38 बायका आणि 89 मुलं आहेत.

मिझोरम
मिझोरम

By

Published : Jun 14, 2021, 4:55 PM IST

ऐझॉल - जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख जिओना चाना यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. जगातील सर्वात मोठे कुटुंब मिझोरोममध्ये आहे. जिओना चाना यांच्या कुटुंबात 38 बायका आणि 89 मुलं आहेत.

जिओना चाना यांचे रविवारी निधन झाले. जिओना यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. रविवारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनावर मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी शोक व्यक्त केला.

मिझोरमच्या बक्टावांग तलांगनममधील गाव हे चाना यांच्या कुटुंबामुळे प्रसिद्ध आहे. जिओना चाना यांच्या कुटुंबात 38 पत्नी, 89 मुलं आणि 33 नातवंडे आहेत. विशेष गोष्ट म्हणजे, हे संपूर्ण कुटुंब एकत्र राहते आणि सर्वांना कामे वाटून देण्यात आली आहेत. चाना कुटुंबाचे 100 खुल्या असलेले चार मजली मोठे घर आहे. या घरात सर्वजण राहतात. मिझोरममध्ये येणारे पर्यटक या कुटुंबाची भेट घेतात. हे संपूर्ण कुटुंब आत्मनिर्भर असून यातील प्रत्येक सदस्याचा कोणता ना कोणता व्यवसाय आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details