महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Asia Cup 2022 IND vs PAK पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज, घ्या जाणून

कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर राहुल द्रविड Head coach Rahul Dravid संघासोबत प्रवास करू शकला नाही. त्यानंतर बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भारताचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.

IND vs PAK
IND vs PAK

By

Published : Aug 28, 2022, 5:52 PM IST

दुबई: मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची कोविड-19 चाचणी निगेटीव्ह Rahul Dravid tests negative for Covid-19 आली आहे. त्यामुळे रविवारी पाकिस्तान विरुद्धच्या IND vs PAK सामन्यापूर्वी तो भारतीय क्रिकेट संघात सामील Rahul Dravid Joins Indian team झाला आहे. आशिया चषक 2022 Asia Cup 2022 या स्पर्धेसाठी संघ रवाना होण्यापूर्वी कोच राहुल द्रविडची कोरोनी टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. परंतु आता तो संसर्गातून पूर्णपणे बरा झाला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI एका निवेदनात म्हटले आहे की, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड Head coach Rahul Dravid यांची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच तो दुबईत संघात सामील झाला आहे; द्रविडच्या अनुपस्थितीत, संघासोबत असलेले अंतरिम प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण Interim coach VVS Laxman भारत अ संघाची तयारी पाहण्यासाठी बंगळुरूला परतले आहेत.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक द्रविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संघासोबत प्रवास करू शकला नाही. त्यानंतर बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे National Cricket Academy प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भारताचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. 23 ऑगस्ट रोजी कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर द्रविड घरीच आयसोलेशनमध्ये होता.

याआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह BCCI Secretary Jai Shah यांनी एक निवेदन जारी केले होते की, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक सौम्य लक्षणे दाखवत आहेत. शाह म्हणाले की, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे आशियाई चषक 2022 साठी यूएईला रवाना होण्यापूर्वी नियमित चाचण्यांमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. ते म्हणाले, द्रविड बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली आहे आणि त्याला सौम्य लक्षणे दिसत आहेत. कोविड-19 निगेटिव्ह आढळल्यास तो संघात सामील होईल.

हेही वाचा -Rohit Sharma Press Conference पाकिस्तानच्या भारत दौऱ्याच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले हे मजेदार उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details