एचडीएफसी बॅंकेने (HDFC Bank) आपल्या गृह कर्जात वाढ केली आहे. भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने कर्जाचा दर वाढवला आहे. एचडीएफसी बँकेने रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये 35 बेसिस पॉइंट्सने वाढ (hikes home and car loan rates) केली आहे. त्यानंतर आता होम लोनचा ईएमआय देखील वाढविला आहे. त्यामुळे आता तुम्हाला कोणतेही नवीन कर्ज घ्यायचे झाल्यास वाढीव दरानेच मिळेल. एचडीएफसी बँकेने मागल्या वर्षीच ही दरवाढ घोषित केली होती, मात्र आता ती लागू करण्यात आली आहे.
एमसीएलआर दरही वाढविला :एचडीएफसी बॅंकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार नवीन व्याजदर 7 जानेवारी 2023 पासुन लागू झालेले आहेत. म्हणजे आता प्रत्येक कर्जावर ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. आरपीएलआर व्यतिरिक्त एचडीएफसी बॅंकेने रात्रऊर कर्जासाठी एमसीएलआर दरही वाढविला आहे. एमसीएलआर आता 8.50 टक्के करण्यात आला. नवीन दरांनुसार आता 1 महिन्यासाठी एमसीएलआर 8.55 टक्के, 3 महिन्यांसाठी 8.60 टक्के, सहा महिन्यांसाठी 8.70 टक्के, एक वर्षासाठी 8.85 टक्के, दोन वर्षासाठी 8.95 टक्के आणि तीन वर्षासाठी 9.05 टक्के व्याजदर आहे.