नवी दिल्ली : ठाकरे गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने समस्न बजावले आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी मोठा सौदा झाला असा थेट दावा संजय राऊत यांनी केल्याने या तीघांविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणी आता उच्च न्यायालयाने तिघांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
ठाकरेंसह राऊतांना समन्स - दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. शिवसेनेचे खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याप्रकरणी त्यांनी या तिघांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे.
ठाकरे गटाला मोठा धक्का - दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रतीक जालान यांनी मानहानीचा दाखल केलेला हा दावा मान्य केला आहे. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तर खासदार शेवाळे यांनी ज्येष्ठ वकील राजीव नायर, अरविंद वर्मा, वकील चिराग शाह आणि उत्सव त्रिवेदी यांच्यामार्फत आपली बाजू दिल्ली उच्च न्यायालयात मांडली आहे.