नवी दिल्ली: दिल्ली हिंसाचाराचा कट रचल्याप्रकरणी ( UAPA ) अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी इशरत जहाँला ( Ishrat Jahan case ) कनिष्ठ कोर्टाने जामीन दिला होता. तो रद्द करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या मागणीवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अनु मल्होत्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
कनिष्ठ कोर्टाने जामीन मंजूर करून प्रस्थापित कायद्याचे उल्लंघन केल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी जहूर वाटालीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत कनिष्ठ कोर्टाने या निर्णयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नसल्याचे म्हटले आहे. इशरत जहाँ इतर आरोपींच्या संपर्कात होती. दंगलीचा कट ( Delhi violence ) रचणे हा तिचा उद्देश होता, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.