हावेरी (कर्नाटक) Margadarsi Chit Funds New Branch : मार्गदर्शी चिट फंड्सने सोमवारी कर्नाटकमध्ये आणखी एक शाखा (Haveri Margadarsi Branch) उघडली आहे. हावेरी शहरातील नवीन शाखेचं उद्घाटन मार्गदर्शी चिट फंडचे संचालक पी लक्ष्मण राव (P Laxman Rao) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पी लक्ष्मण राव म्हणाले की, हावेरी येथे मार्गदर्शी चिट फंडची शाखा उघडली (Margadarsi Chit Funds New Branch) आहे, ती राज्यातील 23 वी शाखा आहे. तर भारतातील 110 वी शाखा बनली आहे.
आतापर्यंत 15 कोटी रुपयांची उलाढाल : राव यांनी हावेरी जिल्ह्यातील सर्व जनतेला 'मार्गदर्शी'च्या सुविधांचा लाभ घेण्यास सांगितलं आहे. हावेरी शाखेनं आतापर्यंत 15 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. या महिन्याच्या अखेरीस 20 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. हावेरी शाखेने 25, 30, 40 आणि 50 महिन्यांच्या चिट कालावधीसह 1 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतची चिट ग्रुप व्हॅल्यू 2,000 ते 1 लाख रुपये प्रति महिना या वर्गणीसह उघडली आहे.