नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने पेगाससची खरेदी केली का, हो किंवा नाही एवढंच उत्तर आम्हाला हवं आहे असे म्हणत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी सर्व विरोधक राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकारविरोधात एकवटल्याचे चित्र बघायला मिळाले.
राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांची एकजूट
यावेळी सर्व विरोधक काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात एकवटल्याचे चित्र दिसून आले. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेचे नेतृत्व केले. तत्पूर्वी पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीचेही नेतृत्व राहुल गांधींनीच केले. या पत्रकार परिषदेत सर्व विरोधकांनी एकमुखाने चर्चेची मागणी केली. राहुल गांधींनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत सरकारने प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी अशी मागणी केली.