नवी दिल्ली- हरियाणाच्या सिंघू सीमेवर तरुणाच्या हत्या प्रकरणात हरियाणा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या तरुणाचा हात कापून बॅरिकेड्सला लटकविला होता.
शेतकऱ्यांचे सिंघू सीमेवर अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. अचानक सीमेवर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सवर 35 वर्षाच्या तरुणाची शुक्रवारी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सर्वजीत सिंग याला अटक केली आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा-CWC बैठकीत G-23 नेत्यांना सोनिया गांधीचे उत्तर...'मी काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्ष'
हत्येपूर्वी तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. हत्येनंतर त्याचे हात कापण्यात आल्याचीही माहिती आहे. मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृत तरुणावर गुरु ग्रंथ साहिबची विटंबना केल्याचा आरोप आहे. धरणे स्थळी उपस्थित असलेल्या निहंगांनी ही घटना घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.