महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुरुग्राममध्ये एका व्यक्तीला 2 किलो गांजासह अटक - Gurugram crime news

आरोपीचे नाव कलीम अन्सारी उर्फ ​​संजू असे असून तो बिहारमधील मोतिहारी येथील रहिवासी आहे. आरोपीने दिल्लीतील नजफगड येथून गांजा आणला होता. अन्सारी गेल्या पाच महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतला होता. चौकशीदरम्यान अन्सारी याने हा अंमली पदार्थ 16 हजार रुपयांना विकत घेतल्याचे कबूल केले. तसेच, याची छोटी पाकिटे बनविली आणि ती गुरुग्राम येथे 150 रुपये प्रति ग्रॅमवर ​​विकत असल्याचेही त्याने सांगितले.

गुरुग्राम क्राईम न्यूज
गुरुग्राम क्राईम न्यूज

By

Published : Nov 26, 2020, 8:00 PM IST

गुरुग्राम (हरियाणा) - गुरुग्राम पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एका अंमली पदार्थ तस्कराला 2 किलो गांजासह अटक केली. जप्त केलेल्या गांजाची किंमत 16 हजार रुपये आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव कलीम अन्सारी उर्फ ​​संजू असे असून तो बिहारमधील मोतिहारी येथील रहिवासी आहे. आरोपीने दिल्लीतील नजफगड येथून गांजा आणला होता. अन्सारी गेल्या पाच महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतला होता.

हेही वाचा -रतलामच्या राजीव नगरात एकाच कुटुंबातील तिघांची गोळ्या झाडून हत्या

चौकशीदरम्यान अन्सारी याने हा अंमली पदार्थ 16 हजार रुपयांना विकत घेतल्याचे कबूल केले. तसेच, याची छोटी पाकिटे बनविली आणि ती गुरुग्राम येथे 150 रुपये प्रति ग्रॅमवर ​​विकत असल्याचेही त्याने सांगितले.

गुरुग्रामचे पोलिस प्रवक्ते सुभाष बोकेन म्हणाले, 'गुरुग्रामच्या घाटा गावातून अन्सारीची माहिती पोलिसांना मिळाली. येथूनच त्याला अटक केली गेली.' याप्रकरणी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई केली जात आहे.

हेही वाचा -दिब्रूगडमधील राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details