महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण; हरियाणा सरकारने जारी केली अधिसूचना - हरियाणा खासगी क्षेत्र आरक्षण

या अधिसूचनेनुसार सर्व उद्योगांना तीन महिन्यांच्या आत आपल्यालकडील ५० हजारांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या पदांबाबत संपूर्ण माहिती सरकारला देणे आवश्यक आहे. तसेच, सध्या ज्यांना नोकऱ्या लागल्या आहेत, किंवा जे कामाला जात आहेत त्यांच्या नोकऱ्यांवर या कायद्याचा काहीही परिणाम होणार नाही.

haryana-government-meeting-will-be-held-with-industrialists-for-75-reservation-in-job-private-sector
खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण; हरियाणा सरकारने जारी केली अधिसूचना

By

Published : Jun 11, 2021, 2:10 PM IST

चंदीगढ : खासगी क्षेत्रामधील नोकऱ्यांमध्ये स्थानिक युवकांना ७५ टक्के आरक्षण देण्याची अधिसूचना हरियाणा सरकारने जारी केली आहे. सरकारने दिलेल्या आदेशांनुसार, ५० हजारांपेक्षा कमी मासिक वेतन असणाऱ्या सर्व पदांवर हा नियम लागू होणार आहे.

गुरुवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हा कायदा लागू होण्याबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले, की आता नोकरीसाठी भरतीची जी प्रक्रिया असेल त्याबाबत चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी उद्योगपतींसोबत बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक येत्या काही दिवसांमध्ये पार पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण; हरियाणा सरकारने जारी केली अधिसूचना

काय म्हटलंय अधिसूचनेत?

या अधिसूचनेनुसार सर्व उद्योगांना तीन महिन्यांच्या आत आपल्यालकडील ५० हजारांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या पदांबाबत संपूर्ण माहिती सरकारला देणे आवश्यक आहे. तसेच, सध्या ज्यांना नोकऱ्या लागल्या आहेत, किंवा जे कामाला जात आहेत त्यांच्या नोकऱ्यांवर या कायद्याचा काहीही परिणाम होणार नाही. केवळ नव्या आणि रिक्त पदांवरच हा कायदा लागू होणार आहे. हरियाणामध्ये खासगी क्षेत्रात सुमारे ४० लाख कर्मचारी काम करतात.

महाराष्ट्रातही मागणी..

दरम्यान, महाराष्ट्रामध्येही खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना आरक्षण मिळावे ही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कित्येक वेळा यासाठी आंदोलनेही केली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details